भूमिकेसाठी अभिनेत्रीने घेतली वकील उज्ज्वल निकमांची भेट, अनुभवही केला शेअर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाली?

न्यायाच्या या लढाईला सुरुवात करण्यापूर्वी ऊर्जाने खऱ्या आयुष्यातील दिग्गज सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. या मालिकेद्वारे..

भूमिकेसाठी अभिनेत्रीने घेतली वकील उज्ज्वल निकमांची भेट, अनुभवही केला शेअर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाली?

Vachan Dile Tu Mala : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'वचन दिले तू मला' या मालिकेने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका सध्या एका रंजक वळणावर असून, मुख्य पात्र 'अ‍ॅडव्होकेट ऊर्जा शिंदे' आता तिच्या आयुष्यातील पहिली आणि अत्यंत आव्हानात्मक केस लढण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यायाच्या या लढाईला सुरुवात करण्यापूर्वी ऊर्जाने खऱ्या आयुष्यातील दिग्गज सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

ऊर्जा आणि उज्ज्वल निकम यांची विशेष भेट
अ‍ॅडव्होकेट ऊर्जा शिंदेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे हिच्यासाठी ही भेट अत्यंत प्रेरणादायी ठरली. पहिल्या केसचा खटला न्यायालयात चालवण्यापूर्वी तिने उज्ज्वल निकम यांच्याकडून वकिली पेशातील बारकावे आणि नैतिकतेचे धडे घेतले. या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अनुष्का म्हणाली की, "निकम सरांना भेटणे हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण होता. त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि प्रेमळ शब्द माझ्या पहिल्या न्यायालयीन लढाईसाठी खूप मोलाचे ठरतील." यापूर्वी निकम यांनी 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतही अशीच विशेष उपस्थिती लावली होती. आता या मालिकेद्वारेही उज्ज्वल निकम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसू शकतात, अशीही एक शक्यता वाटत आहे.

न्यायालयातील रणसंग्राम: ऊर्जा विरुद्ध जहागीरदार
मालिकेतील हा टप्पा केवळ एक खटला नसून तो न्यायासाठीचा मोठा संघर्ष असणार आहे. ऊर्जाला न्यायालयात साध्यासुध्या वकिलाचा नाही, तर निष्णात वकील 'हर्षवर्धन जहागीरदार' यांचा सामना करायचा आहे. जहागीरदार यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गवळी साकरत असून, ते या मालिकेत एका शक्तिशाली खलनायकाच्या रुपात दिसत आहेत. ऊर्जाची ही पहिलीच केस तिच्या करिअरची आणि तत्त्वांची अग्निपरीक्षा ठरणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – Shiv Thakare Wedding : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे अडकला लग्नबंधनात, कोण आहे जीवनसाथी? फोटो समोर

मालिकेची स्टारकास्ट आणि यशस्वी वाटचाल
'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेच्या निरोपानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेली ही मालिका वकिली पेशावर आधारित आहे. यामध्ये अनुष्का सरकटेसोबत अभिनेता इंद्रनील कामत 'शौर्य' या मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे, 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांनी 'अनिरुद्ध'ची प्रतिमा मोडीत काढत 'हर्षवर्धन' या कडक वकिलाची भूमिका चोख बजावली आहे. अनुष्का सरकटेने याआधी '36 गुणी जोडी' मधून प्रसिद्धी मिळवली होती, मात्र ऊर्जा शिंदेच्या रुपात ती आता घराघरात पोहोचली आहे.

न्याय आणि वचनांची अनोखी गोष्ट
'वचन दिले तू मला' ही मालिका केवळ कोर्टरूम ड्रामा नसून, ती सत्य आणि असत्य यांच्यातील संघर्षाची कथा आहे. ऊर्जाचा आत्मविश्वास आणि शौर्यची तिला मिळणारी साथ यामुळे ही मालिका टीआरपी चार्टवरही वरच्या क्रमांकावर आहे. आता उज्ज्वल निकम यांच्या आशीर्वादाने ऊर्जा ही पहिली केस जिंकून गरिबांना न्याय मिळवून देऊ शकेल का? आणि हर्षवर्धन जहागीरदार यांच्या कुटील डावांना ती कशी उत्तर देईल? हे पाहणे आगामी भागांमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Big Boss Marathi 6: दार उघडणार, नशिबाचा खेळ पालटणार'; बिग बॉस मराठीच्या घरात हे 17 स्पर्धक दाखल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number