UPSC Final Result 2025: UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

यूपीएससीने अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, या निकालानंतर प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांचे नाव निश्चित झाले आहे.<br/>

UPSC Final Result 2025: UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

UPSC Final Result 2025: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) बहुप्रतीक्षित नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर केला आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत अनुज अग्निहोत्री याने देशात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. यूपीएससीने अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, या निकालानंतर प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांचे नाव निश्चित झाले आहे.

गुणवत्तेची भरारी: टॉप 20 उमेदवारांची यादी
यंदाच्या निकालात विविध राज्यांतील उमेदवारांनी आपली मोहोर उमटवली आहे. पहिल्या 20 यशस्वी उमेदवारांमध्ये अनुज अग्निहोत्री यांच्यासह राजेश्वरी सुवे एम (दुसरा क्रमांक) आणि आकांश धुल्ल (तिसरा क्रमांक) यांचा समावेश आहे.  

20 उमेदवारांचे रोल नंबर आणि नावे

1     1131589    अनुज अग्निहोत्री
2    4000040    राजेश्वरी सुवे एम
3    3512521    आकांश धुल्ल
4    0834732    राघव झुनझुनवाला
5    0409847    ईशान भटनागर
6    6410067    झिनिया अरोरा
7    0818306    ए आर राजा मोहिद्दीन
8    0843487    पक्ष सचिव
9    0831647    आस्था जैन
10    1523945    उज्ज्वल प्रियांक
11    1512091    यशस्वी राज वर्धन
12    0840280    अक्षित भारद्वाज
13    7813999    अनन्या शर्मा
14    5402316    सुरभी यादव
15    3507500    सिमरनदीप कौर
16    0867445    मोनिका श्रीवास्तव
17    0829589    चितवन जैन
18    5604518    श्रुती आर
19    0105602    निसार दिशांत अमृतलाल
20    6630448    रवी राज

हेही वाचा – NEET UG 2026: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; अर्ज भरण्यासाठी 'ही' आहे शेवटी तारीख

प्रशासकीय प्रवासाची सुरुवात
यूपीएससीच्या या निकालाद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर झालेल्या मुलाखती अशा कठीण टप्प्यांमधून पार पडलेल्या या उमेदवारांचे देशभरातून कौतुक होत आहे. यशस्वी उमेदवारांच्या गुणांची यादी देखील लवकरच आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number