UPI Payment: आता परदेशी नंबरवरूनही करता येणार UPI पेमेंट! IDFC फर्स्ट बँकेने सुरू केली आहे ‘ही’ सेवा

IDFC फर्स्ट बँकेने आपल्या NRI ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. याद्वारे बँकेचे NRI ग्राहक परदेशी नंबरवरून देखील UPI द्वारे पेमेंट करू शकतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.<br/>

UPI Payment: आता परदेशी नंबरवरूनही करता येणार UPI पेमेंट! IDFC फर्स्ट बँकेने सुरू केली आहे ‘ही’ सेवा
Edited Image

नवी दिल्ली: सध्याच्या डिजिटल युगात अनेक कामे ऑनलाइन केली जात आहेत. अनेक मोठी कामे फक्त एका क्लिकवर होतात. पैशांचे व्यवहारही डिजिटल पद्धतीने खूप वेगाने वाढले आहेत. UPI च्या आगमनाने हे काम खूप सोपे झाले आहे. IDFC फर्स्ट बँकेने आपल्या NRI ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. याद्वारे बँकेचे NRI ग्राहक परदेशी नंबरवरून देखील UPI द्वारे पेमेंट करू शकतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, बँकेने ही सुविधा 12 देशांमध्ये सुरू केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, हाँगकाँग, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती (UAE), युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) यांचा समावेश आहे. या देशांमधील बँकेच्या सर्व NRE आणि NRO बँक खातेधारकांना ही सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा – PAN Card, ATM पासून रेल्वेपर्यंत 1 जुलैपासून बदलणार 'हे' नियम! तुमच्या खिशावरही होणार परिणाम

परदेशातून करता येणार UPI पेमेंट – 

दरम्यान, आता IDFC बँकेचे NRI ग्राहक आता फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे द्वारे आंतरराष्ट्रीय सिमवरून पेमेंट करू शकतात. यासाठी बँकेच्या ग्राहकांना UPI खाते भारतीय नंबरऐवजी आंतरराष्ट्रीय नंबरशी लिंक करावे लागेल. या सुविधेसाठी बँकेकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. अशा परिस्थितीत, आता बँकेच्या एनआरआय ग्राहकांना बिल भरणे, क्यूआर कोड किंवा यूपीआय आयडीने व्यवहार करणे सोपे होईल.

हेही वाचा – मोठ्या व्यवहारांवर आयकर विभागाची ठेवते करडी नजर! व्यवहार कसे ट्रॅक केले जातात? जाणून घ्या

UPI कोणत्या देशांमध्ये काम करते?

भारताची ऑनलाइन पेमेंट सिस्टम UPI केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही काम करते. भारत सरकारने (MyGovIndia) एक जागतिक नकाशा शेअर केला होता, ज्यामध्ये UPI आता कुठे वापरता येते हे दाखवले होते. यामध्ये फ्रान्स, UAE, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, ओमान, कतार, रशिया आणि मॉरिशस सारखे देश समाविष्ट आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number