Women’s Day 2026: महिला दिनानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात अनोखा उपक्रम; महिला भाविकांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

'आंतरराष्ट्रीय महिला दिना'चे औचित्य साधून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील प्रसिद्ध श्री काशी विश्वनाथ मंदिराने एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.

Women’s Day 2026: महिला दिनानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात अनोखा उपक्रम; महिला भाविकांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

Women's Day 2026: येत्या 8 मार्च रोजी साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'चे औचित्य साधून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील प्रसिद्ध श्री काशी विश्वनाथ मंदिराने एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो महिला भाविकांचा सन्मान आणि सोय लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्थेची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत महिला आणि लहान मुलांसाठी 'सुगम' दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे.

बाबांच्या दर्शनासाठी गेट क्रमांक 4-B राखीव
महिला भाविकांना गर्दीचा त्रास होऊ नये आणि त्यांना विनाअडथळा बाबा विश्वनाथांचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिराचे गेट क्रमांक 4-B विशेषतः राखून ठेवण्यात आले आहे. या गेटमधून केवळ महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांनाच प्रवेश दिला जाईल. यामुळे मुख्य रांगेतील गर्दी टाळून महिलांना शांततेत दर्शन घेता येईल. वाराणसीच्या स्थानिक महिलांसह बाहेरून येणाऱ्या सर्व महिला पर्यटकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

वेळेचे नियोजन आणि मोफत प्रवेश
ही विशेष दर्शन व्यवस्था सकाळी 4 ते 5 आणि संध्याकाळी 4 ते 5 या आरतीच्या वेळा वगळता संपूर्ण दिवसभर सुरू राहील. विशेष म्हणजे, या गेटमधून प्रवेश करण्यासाठी महिलांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. महिलांच्या मांडीवर असलेली लहान मुले, तसेच इतर मुले-मुली यांनाही या व्यवस्थेअंतर्गत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा सरकारी संस्थांना कडक इशारा! कोर्टाचे आदेश पाळा, अन्यथा…

महिला शक्तीचा सन्मान
काशी विश्वनाथ धाममध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा परिस्थितीत महिला दिनानिमित्त करण्यात आलेली ही स्वतंत्र व्यवस्था महिला शक्तीचा गौरव करणारी ठरली आहे. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे काशी विश्वनाथ धामला भेट देणाऱ्या हजारो महिला भाविकांचा प्रवास सुखकर आणि संस्मरणीय होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number