Harshwardhan Sapkal: ‘मनमोहन सिंग यांचं सरकार असताना 55 रुपयांमध्ये डिझेल, मग आता 100 पार का?’; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर निशाणा

सध्याच्या आणि पूर्ववर्ती केंद्र सरकारच्या आर्थिक नियोजनाची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली.

Harshwardhan Sapkal: ‘मनमोहन सिंग यांचं सरकार असताना 55 रुपयांमध्ये डिझेल, मग आता 100 पार का?’; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर निशाणा

Harshwardhan Sapkal: ‘देश आणि महाराष्ट्रात सध्या सत्तेवर बसलेले नेते अत्यंत खोटारडे आणि बेजबाबदार आहेत,’ अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्याचे राज्यकर्ते सर्व गैरव्यवहार करून आणि जनतेची दिशाभूल करून स्वतः नामानिराळे होत आहेत. कोणतीही जबाबदारी न स्वीकारता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘आपला यात काहीच दोष नाही’ अशा प्रकारचे बेजबाबदार विधान करत आहेत. फडणवीस यांनी या भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज असून, त्यांना गजनी म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. यापूर्वी विरोधकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले होते, मात्र आता या सर्व गैरनियोजनाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मनमोहन सिंग सरकारचे उत्कृष्ट नियोजन 
सध्याच्या आणि पूर्ववर्ती केंद्र सरकारच्या आर्थिक नियोजनाची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, जेव्हा डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलची (कच्चे तेल) किंमत प्रति बॅरल 108 डॉलर इतकी प्रचंड होती. एवढी महागडी खरेदी असतानाही मनमोहन सिंग सरकारने अत्यंत उत्कृष्ट आर्थिक नियोजन करून देशातील जनतेला अवघ्या 55 रुपायांमध्ये डिझेल उपलब्ध करून दिले होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल तितकेच किंवा त्याहून कमी असतानाही देशात डिझेलचा आकडा 100 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. यावरून सध्याच्या सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा – Devendra Fadanvis: तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांना इंधन मिळेना, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

‘कोणी कुठून किराणा घ्यावा हे पंतप्रधान ठरवणार का?’; हुकूमशाहीच्या प्रवृत्तीचा निषेध
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेताना सपकाळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “कोणी कोणत्या किराणा दुकानातून तेल किंवा सामान खरेदी करावे, हे जर आता देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री ठरवू लागले, तर आपण लोकशाहीत आहोत की हुकूमशाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारत हा एक सार्वभौम, स्वतंत्र आणि विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे जनतेच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या किंवा लादल्या जाणाऱ्या कोणत्याही बंदीचा एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी संघटितपणे निषेध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

 आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारताने स्वतंत्र बाणा दाखवावा 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय दबावाचा उल्लेख करत हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधानांना आपला स्वतंत्र बाणा दाखवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, भारताने कोणत्याही बाह्य देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या दबावाला न जुमानता, देशातील जनतेच्या हितासाठी ज्या ठिकाणाहून स्वस्त आणि सुलभतेने कच्चे तेल उपलब्ध असेल, तिथून त्याची खरेदी केली पाहिजे. सरकारने सध्या पसरत असलेल्या विविध अफवांना आळा घालून, त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी आणि देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना इंधन पुरवठ्यात सर्वात आधी प्राधान्य देऊन याचे सुयोग्य नियोजन करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी शेवटी केली.
 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number