Uddhav Thackeray On BJP: ‘भाजपला आम्ही मोठं केलं, आता तेच आम्हाला…’; मनसेशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

16 जानेवारी 2026 रोजी लागणारा निकाल मुंबईच्या सत्तेची दिशा ठरवणार असून, मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमच्या युतीचाच असेल, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.<br/>

Uddhav Thackeray On BJP: ‘भाजपला आम्ही मोठं केलं, आता तेच आम्हाला…’; मनसेशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray On BJP: महाराष्ट्राच्या राजकारणात अखेर ती ऐतिहासिक घटना घडली आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या अनेक वर्षांपासून होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. 15 जानेवारी रोजी होणारे मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी लागणारा निकाल मुंबईच्या सत्तेची दिशा ठरवणार असून, मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमच्या युतीचाच असेल, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेत – उद्धव ठाकरे 

या युतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. ज्या भाजपला कोणी ओळखत नव्हते, त्यांना आम्ही खेडोपाडी पोहोचवले. ज्यांना आम्ही मोठे केले, तेच आज आमच्या पाठीत वार करत आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, दोन गुजराती आपल्याला गिळायला निघाले आहेत. अशा वेळी आपण आपापसात भांडत बसलो, तर ही लढाई हरलोच समजा. त्यामुळे आता वैयक्तिक मतभेद बाजूला सारून एकत्र लढण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा – Gautam Adani in Baramati: रोहित पवारांनी चालवली गाडी, अजित पवारांनी केलं स्वागत; देशातील पहिल्या एआय कॉलेजचं अदानी यांच्या हस्ते बारामतीमध्ये उद्घाटन

जागावाटपावर कार्यकर्त्यांना साद

मनसेसोबतच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना वास्तववादी भूमिका घेण्याचे आवाहन केले. युती किंवा आघाडीमध्ये 100 टक्के गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. काही जागा आपल्या हक्काच्या असूनही त्या मित्रपक्षासाठी सोडाव्या लागतात. पण, भाजप केवळ युती तोडायला नाही, तर आपल्याला संपवायला निघाला आहे, हे लक्षात ठेवा,असे सांगत त्यांनी जागावाटपातील तडजोडीचे संकेत दिले.

हेही वाचा – BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीत धाकधूक; फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, काय होणार निर्णय?

पक्षातील निष्ठावंतांना भावनिक साद घालताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही एकदा माझ्या खुर्चीत बसून बघा, मग निर्णय घेताना होणारी कसरत समजेल. मी पक्षाच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे, पण तुम्ही तुमची निष्ठा विकू नका. मला एकही माणूस फुटलेला चालणार नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number