Chandrashekhar Bawankule: ‘उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे…’; खासदार फुटण्याच्या चर्चांवर बावनकुळेंचा खोचक सल्ला

या संपूर्ण राजकीय गदारोळावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका अधिकृतपणे स्पष्ट केली आहे.

Chandrashekhar Bawankule: ‘उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे…’; खासदार फुटण्याच्या चर्चांवर बावनकुळेंचा खोचक सल्ला

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ या नव्या मोहिमेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ही गुप्त मोहीम राबवली जात असून, ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीतही राजकीय हालचाली कमालीच्या वेगवान झाल्या आहेत.

या मोहिमेशी आमचा काडीचाही संबंध नाही – 
या संपूर्ण राजकीय गदारोळावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका अधिकृतपणे स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या कथित मोहिमेपासून भाजपला पूर्णपणे लांब ठेवले. बावनकुळे म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आपापल्या पक्षाचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. या तथाकथित ‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा दूरवरचाही संबंध नाही. ज्या विषयाची आम्हाला पुसटशीही कल्पना नाही, त्यावर आमच्या पक्षाच्या नेत्यांनी भाष्य करणे पूर्णपणे अयोग्य आहे.”

हेही वाचा – Shivsena UBT Operation Tiger : उबाठा खासदारांचा गट लवकरच होणार शिवसेनेत विलीन; स्वतंत्र गटस्थापनेला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी

ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे; बावनकुळेंचा सल्ला
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना राजकीय सल्ला देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षांतर्गत नाराजीवर बोट ठेवले. प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी आपला गट सांभाळावा आणि शिंदेंनी त्यांचा पक्ष वाढवावा, यात काहीच गैर नाही. परंतु, ठाकरे यांचे सहकारी त्यांना सोडून का जात आहेत, याचे आत्मचिंतन स्वतः उद्धव ठाकरेंनीच करायला हवे. या अंतर्गत वादात भाजपला ओढण्याची गरज नाही.”

प्रत्येक खासदाराला ’50’ कोटींची ऑफर; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संभाव्य पक्षांतरामागे प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेत खळबळ उडाली दिली की, “काल रात्री साधारण 10:30 ते 11 च्या सुमारास मला एका अत्यंत विश्वसनीय सूत्राकडून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीची माहिती मिळाली. चालू असलेल्या या व्यवहारात प्रति खासदार 50 कोटी रुपयांचा दर निश्चित करण्यात आल्याचे मला सांगण्यात आले.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number