Winter Session: मुनगंटीवारांचे रौद्ररूप, तर उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे आक्रमक; आजच्या अधिवेशनातील ठळक मुद्दे

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून विविध विषयांवरून सभागृहाचे लक्ष वेधणारी पाच मोठी विधानं समोर आली.<br/>

Winter Session: मुनगंटीवारांचे रौद्ररूप, तर उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे आक्रमक; आजच्या अधिवेशनातील ठळक मुद्दे

Winter Session: राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या तापलेल्या वातावरणात सुरू असून आजचा दिवस राजकीय वक्तव्यांनी आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून विविध विषयांवरून सभागृहाचे लक्ष वेधणारी पाच मोठी विधानं समोर आली.

उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी

विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवरून नाराजी व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि राम शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याची प्रक्रिया विलंबित असल्याचे सांगत त्यांनी हा निर्णय अधिवेशनाअखेर घेण्याची मागणी केली. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदालाही संविधानिक मान्यता नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेतेपद थांबवणार असाल तर उपमुख्यमंत्रिपदही तात्काळ रद्द करा, असा थेट सल्ला दिला.

मुनगंटीवारांचा सरकारवर संताप; घरकुल निधीवरून हल्लाबोल

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा निधी मिळत नसल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार टिका केली. एक हफ्ता मिळाला की दुसऱ्यासाठी चातक पक्ष्यासारखी प्रतीक्षा करावी लागते. कापूसकोंड्याची गोष्ट संपेल, बिरबलाची खिचडी शिजेल, पण निधी मात्र येत नाही, अशा म्हणींचा वापर करत त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडून स्पष्ट आश्वासनाची मागणी केली.

हेही वाचा – Winter Session 2025: प्रसाद लाड यांना सभागृहात लागला शॉक; म्हणाले, 'मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल'

गिरीश महाजनांचे खडसेंवर नवीन वार

भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांचा दोषमुक्ती अर्ज न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधला. 3.75 कोटींना घेतलेली जमीन सरकारी मूल्यांकनानुसार 33 कोटींची होती, पण सरकारी विक्रीसाठी त्यांनी 80 कोटींची मागणी केली, असे सांगत हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Sharad Pawar Birthday : देशाच्या राजकारणाचे भीष्माचार्य, 86 वर्षांचा तरुण योद्धा; शरद पवारांच्या वाढदिवशी 86 किलो लाडूवाटप

पुण्यातील तीन महापालिकांचा प्रस्ताव कुठे?  

दरम्यान, हिंजवडी, चाकण आणि उरळी देवाची–फुरसुंगी–लोणी काळभोर–वाघोली या तीन नवीन महापालिका करण्याचा प्रस्ताव असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, विधानपरिषदेत उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत (शिंदे गट) यांनी असे कोणतेही अभिलेख उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या महापालिका स्थापन करण्यावरील अनिश्‍चितता आणखी वाढली.

सोयाबीन खरेदी केंद्रासाठी तीन लाखांची मागणी? वडेट्टीवारांचा स्फोटक आरोप

नांदेड आणि यवतमाळमधील शेतकऱ्यांकडून सोयाबीन नाकारले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्र्यांच्या ओएसडीवर थेट तीन लाख रुपये मागण्याचा गंभीर आरोप केला. या आरोपाची गंभीर दखल घेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number