Uddhav Thackeray And Eknath Shinde: विधानभवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागणार तेवढ्यात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते एकमेकांच्या अगदी जवळून गेले.

Uddhav Thackeray And Eknath Shinde: विधानभवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागणार तेवढ्यात…

Uddhav Thackeray And Eknath Shinde: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शुक्रवारी विधानभवन परिसरात एका अनपेक्षित राजकीय भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते एकमेकांच्या अगदी जवळून गेले. या अनपेक्षित भेटीत दोन्ही नेत्यांमधील राजकीय तणाव स्पष्टपणे जाणवत होता, ज्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेमकं काय घडलं विधानभवनाच्या कॉरिडॉरमध्ये?
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी जात होते, तर त्याचवेळी समोरून एकनाथ शिंदे येत होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दोन्ही नेते समोरासमोर येताच त्यांनी एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गर्दीतून मार्ग काढताना दोन्ही नेते इतके जवळ आले होते की, त्यांचा खांदा एकमेकांना स्पर्श करेल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, कोणतीही नजरभेट न घेता किंवा साधे अभिवादन न करता दोघेही आपल्या दिशेने निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Maharashtra Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, पण कोणाला मिळणार लाभ? वाचा

जुन्या आठवणींना उजाळा; फोटोसेशनचा ‘तो’ किस्सा
याआधीही विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या वेळी हे दोन्ही नेते आमनेसामने आले होते. त्यावेळी सर्व नेत्यांचे सामूहिक फोटोसेशन आयोजित करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या शेजारीच उद्धव ठाकरेंसाठी खुर्ची ठेवण्यात आली होती, परंतु उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणे टाळले होते. आजच्या या ‘कॉरिडॉर’मधील घटनेने दोन्ही नेत्यांमधील राजकीय दरी किती खोल आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number