Under 19 World Cup Schedule : अंडर-19 विश्वचषकात भारताचा पहिला सामना कधी?; भारत-पाकिस्तान सामना होणार का?, पाहा संपूर्ण वेळापत्रक

ICC ने पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील (Under-19) एकदिवसीय विश्वचषकाचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे.

Under 19 World Cup Schedule : अंडर-19 विश्वचषकात भारताचा पहिला सामना कधी?; भारत-पाकिस्तान सामना होणार का?, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Under 19 World Cup Schedule Announced: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील (Under-19) एकदिवसीय विश्वचषकाचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे. क्रिकेट रसिकांचे लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबतही आयसीसीने मोठा निर्णय घेतला असून, दोन्ही संघांना लीग टप्प्यात वेगवेगळ्या गटात ठेवले आहे. जानेवारी महिन्यात सुरू होणारी ही स्पर्धा नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे संयुक्तपणे खेळवली जाणार आहे.

हेही वाचा – Women T20 Series: BCCI चा मोठा निर्णय! भारत-बांगलादेश महिला मालिका पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेण्यात आला निर्णय

भारत-पाक कधी भिडणार  

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धकांना वेगवेगळ्या गटांमध्ये स्थान देण्यात आले आहे. याचा अर्थ, लीग स्टेजमध्ये हे संघ एकमेकांसमोर येणार नाहीत.

गट 'अ' मध्ये भारत: भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड.

गट 'ब' मध्ये पाकिस्तान: झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड.

वेळापत्रकानुसार, दोन्ही संघ आपापल्या गटात अव्वल कामगिरी केल्यास, ते स्पर्धेच्या पुढील टप्प्यात म्हणजेच सुपर सिक्स किंवा उपांत्य फेरीत (Semi-Finals) एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs SA 2nd Test: दुसऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही संघात मोठे बदल! गिलच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, तर दक्षिण आफ्रिकेत रबाडाच्या जागी 'या' चेहऱ्याला संधी

स्पर्धेचे स्वरूप आणि प्रमुख तारखा

पुढील वर्षी होणारा हा 16 वा अंडर-19 विश्वचषक आहे. 23 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभागी होतील आणि एकूण 41 सामने खेळले जातील.
 
भारताचे लीग सामने (गट 'अ' मध्ये):

15 जानेवारी: अमेरिका विरुद्ध भारत, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
17 जानेवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
24 जानेवारी: भारत विरुद्ध न्यूझीलंड, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो 

हा विश्वचषक आगामी काळातील क्रिकेट स्टार्सना ओळखण्याची एक महत्त्वाची संधी देतो, ज्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दल मोठी उत्सुकता आहे. दरम्यान,  आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं की, या स्पर्धेची उत्सुकता आहे. यात जागतिक क्रिकेटमधील भविष्यातील स्टार्स दिसतील. ही स्पर्धा केवळ पुढच्या पिढीतील क्रिकेटपटूंनाच नव्हे तर पुढच्या पिढीतील आयकॉननाही समोर आणते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number