Gajanan Kale: ‘उत्सव साजरा करायचा की दुःख व्यक्त करायचं…’; गणवेश-पुस्तकांवरून गजानन काळे यांचा सरकारवर थेट हल्लाबोल

शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी राज्यभरात कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. परंतु, मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Gajanan Kale: ‘उत्सव साजरा करायचा की दुःख व्यक्त करायचं…’; गणवेश-पुस्तकांवरून गजानन काळे यांचा सरकारवर थेट हल्लाबोल

Gajanan Kale: शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी राज्यभरात कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. परंतु, मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गजानन काळे यांनी म्हटलं आहे की, “आजपासून महाराष्ट्र राज्य आणि नवी मुंबईतील सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध महापालिकांचे आयुक्त, महापौर आणि लोकप्रतिनिधींनी ‘प्रवेशोत्सव’ असे गोंडस नाव देऊन, हातात पुष्पगुच्छ घेऊन आणि ढोल-ताशांच्या गजरात मुलांचे स्वागत केले. परंतु, या उत्सवाचे दुर्दैव असे आहे की, शाळांचा पहिला दिवस उजाडला तरी सरकारी आणि महानगरपालिकांच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना अजूनही नवीन गणवेश, बूट आणि वह्या-पुस्तके मिळालेली नाहीत.”

हेही वाचा – Abhijeet Dipke CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण; गर्दीचा फायदा घेतला अन्…

उत्सव साजरा करायचा की दुःख मांडायचे? काळे यांचा सवाल
शासकीय नियोजनावरील ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त करत गजानन काळे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली. “मुलांना शैक्षणिक साहित्यच मिळाले नसेल, तर या दिवशी खेद व्यक्त करायचा, दुःख मांडायचे की कसला हा उत्सव साजरा करायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सत्ताधारी हे अत्यंत निर्लज्जपणे वागत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

नवी मुंबईत 35-40 कोटींचे कंत्राट, तरीही साहित्यासाठी महिन्यांची प्रतीक्षा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवत काळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि साहित्यासाठी तब्बल 35 ते 40 कोटी रुपयांचे कंत्राट काढण्यात आले आहे. असे असूनही, गेल्या दोन वर्षांपासून शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांनी मुलांना गणवेश मिळत असल्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, अशा तीव्र भावना मनसे प्रवक्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या आरोपामुळे आता शाळांच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच तापण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number