Rupali Thombare Vs Rupali Chakankar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘दोन रूपालीं’चा संघर्ष उफाळला! ठोंबरे यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस

पक्षशिस्त भंग केल्याच्या आरोपावरून रूपाली ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यात आली असून, सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.<br/>

Rupali Thombare Vs Rupali Chakankar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘दोन रूपालीं’चा संघर्ष उफाळला! ठोंबरे यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस

Rupali Thombare Vs Rupali Chakankar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या दोन महिला नेत्यांमधील संघर्ष चांगलाच गाजत आहे. महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील या दोघींमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता उघडपणे रंगू लागला आहे. पक्षशिस्त भंग केल्याच्या आरोपावरून रूपाली ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यात आली असून, सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, “महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना आपण केलेले वक्तव्य हे पक्षाच्या शिस्तीविरुद्ध आहे.”

मला नोटीस नाही, खुलासा पत्र दिलं आहे; रूपाली ठोंबरे यांची प्रतिक्रिया 

यावर प्रतिक्रिया देताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, “मला पक्षाची नोटीस नाही, तर खुलासा पत्र देण्यात आलं आहे. रूपाली चाकणकर यांच्या बाबतीत मी माध्यमांसमोर जे विधान केलं, त्यासंदर्भात पक्षाने खुलासा मागितला आहे. मी कायदेशीर खुलासा देणार असून, माझं सत्य दस्तऐवजांसह मांडणार आहे.” ठोंबरे यांनी माधवी खंडाळकर यांच्या मारहाणीच्या प्रकरणावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, सुरुवातीला पोलीस ठाण्यात वाद मिटल्याचं सांगण्यात आलं, मात्र नंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सीपींना तक्रार दिल्यानंतर पुन्हा प्रकरण पुढे आलं. आधी तक्रारी मागे घेतल्या, मग पुन्हा गुन्हा का दाखल केला, हा प्रश्न आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray: ‘शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करतील…’; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

त्यांनी पुढे म्हटलं की, मी देखील माधवी खंडाळकर यांच्यावर 354 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कोणाला फोन केले, त्याचे सीडीआर मी मागवले आहेत. तसेच त्यांनी अजित पवारांना भेट घेतली, मग त्यामागे कोणाचा दबाव होता का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. तथापी, रुपाली ठोंबरे पुढे यांनी म्हटलं आहे की, मी रूपाली चाकणकर यांच्या आयोगाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्ष आणि आयोग या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत. माझ्याविरोधात सोशल मीडियावर जे पोस्ट केले गेले, त्या सगळ्यांमध्ये रूपाली चाकणकर यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग आहे. स्नेहल चव्हाण नावाच्या मुलीने माझ्याबद्दल पोस्ट केली होती आणि ती चाकणकर यांच्याशी संबंधित आहे.  

हेही वाचा – Maharashtra politics : नगरपालिका निवडणुकीत ‘स्वबळा’चे संकेत!; सिंधुदुर्गात राणे-केसरकर आमनेसामने, महायुतीतील तणाव पुन्हा चव्हाट्यावर

या सगळ्याचे पुरावे मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. माझ्या खुलासा पत्रात मी सर्व कागदपत्रे आणि पुरावे जोडले आहेत, असं ठोंबरे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रूपाली ठोंबरे आणि रूपाली चाकणकर या दोन वरिष्ठ महिला नेत्यांतील संघर्ष आता शिस्तभंगाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या वादामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number