Cricketer Assault: ‘या’ राष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांकडून मारहाण; तीव्र संतापानंतर 3 पोलिस अधिकारी निलंबित

हे प्रकरण देशभरात गाजल्यानंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तर या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Cricketer Assault: ‘या’ राष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांकडून मारहाण; तीव्र संतापानंतर 3 पोलिस अधिकारी निलंबित

Cricketer Assault: मैदानाबाहेरील एका गंभीर वादामुळे सध्या बांगलादेशी क्रिकेट विश्वात मोठी खळबळजनक उडाली आहे. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज नईम हसन याच्याशी पोलिसांनी कथित गैरवर्तन आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण देशभरात गाजल्यानंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तर या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना 12 जून च्या रात्री चट्टोग्राम (Chattogram) येथे घडली. नईम हसन हा 'ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग' संपवून ढाका विमानतळावरून आपल्या घरी परतत असताना हा प्रकार घडला.

क्रिकेटपटूची मान पकडून बळजबरी करण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, नईम लालखान बाजार परिसरातून सीएनजी (CNG) ऑटो-रिक्षाने जात असताना पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची रिक्षा अडवली. नईमने आरोप केला आहे की, तपासणी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक आणि उद्धट वर्तन केले. पोलिसांनी थेट त्याची मान पकडली आणि त्याला जबरदस्तीने दुसऱ्या रिक्षात बसवून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित स्थानिक नागरिकांनी तो बांगलादेशचा राष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याचे पोलिसांना वारंवार सांगितले, परंतु अधिकाऱ्यांनी कोणाचेही ऐकले नाही. अखेर 13 June च्या पहाटे नईमची सुटका झाली.

पोलिसांची माफी आणि निलंबनाची कारवाई
या घटनेचे वृत्त सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर येताच संपूर्ण बांगलादेशातून संताप व्यक्त करण्यात आला. वाढता दबाव पाहून चट्टोग्राम मेट्रोपॉलिटन पोलिसांनी तातडीने कारवाई करत उपनिरीक्षक मोहम्मद शफिकुल इस्लाम भुईयन, कॉन्स्टेबल मोहम्मद रसेल चौधरी आणि अन्य एका पोलीस अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2026: दीप्ती शर्मा नंबर 1 बनण्यापासून अवघ्या 2 विकेट्स दूर; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात घडणार इतिहास?

पोलीस आयुक्तांची क्रिकेटपटूच्या घरी भेट
चट्टोग्राम मेट्रोपॉलिटन पोलीस आयुक्त शौकत अली यांनी स्वतः नईम हसनच्या निवासस्थानी जाऊन त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. चौकशी समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर दोषींवर आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणावर नंतर प्रतिक्रिया देताना नईम हसन म्हणाला की, "त्या वेळी मी प्रचंड घाबरलो होतो. जर तिथे माझे चाहते आणि स्थानिक नागरिक वेळेवर जमा झाले नसते, तर माझ्यासोबत आणखी गंभीर प्रसंग घडू शकला असता."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number