Devendra Fadnavis: ‘देशात घरगुती गॅसचे कोणतेही संकट नाही, काँग्रेस जाणीवपूर्वक…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील औद्योगिक क्रांतीवर भाष्य करताना सांगितले की, भद्रावती येथे होणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांमुळे जवळपास 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

Devendra Fadnavis: ‘देशात घरगुती गॅसचे कोणतेही संकट नाही, काँग्रेस जाणीवपूर्वक…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis: “देशात घरगुती गॅसचे कोणतेही संकट नसून काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये गैरसमज आणि भीती पसरवण्याचे काम करत आहे,” असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भद्रावती येथे विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गॅस कंपन्या आणि संबंधित सचिवांनी स्पष्ट केले आहे की, देशाला दर महिन्याला जेवढ्या गॅसची आवश्यकता आहे, तेवढा पुरवठा नियमित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण रांगा लावण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशाच्या ऊर्जा सुरक्षेत विदर्भाचे मोठे योगदान
देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील औद्योगिक क्रांतीवर भाष्य करताना सांगितले की, भद्रावती येथे होणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांमुळे जवळपास 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या माध्यमातून सुमारे 10,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. विशेषतः ‘कोल गॅसिफिकेशन’ (Coal Gasification) तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी ‘ग्रीन स्टील’ची निर्मिती केली जाणार आहे. प्रदूषणमुक्त प्रक्रियेतून तयार होणाऱ्या या स्टीलला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असून, भारताला या क्षेत्रात जगात अग्रेसर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रीन स्टील आणि आत्मनिर्भर भारत
भद्रावती येथे सुरू होणारा हा प्रकल्प देशातील पहिलाच अशा प्रकारचा प्लांट असून, त्याचा पहिला टप्पा येत्या 2 वर्षांत पूर्ण होणार आहे. सध्या भारताला अनेक आवश्यक केमिकल्स आणि कार्बन कॅप्चरिंग घटकांसाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, या प्रकल्पांमुळे हे घटक आता देशातच तयार होतील, ज्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा (Energy Security) अधिक मजबूत होईल. विदर्भ या माध्यमातून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठे योगदान देणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Sunil Tatkare: सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवेंवर 65 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा; काय आहे नेमकं प्रकरण?

काँग्रेसच्या भूमिकेवर कडक टीका
गॅस टंचाईच्या अफवांवरून काँग्रेसवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, ऑनलाईन बुकिंगद्वारे लोकांना वेळेत गॅस उपलब्ध करून दिला जात आहे. पुरेसा साठा असतानाही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना रांगेत उभे करण्यास भाग पाडणे, ही काँग्रेसची बुद्धी देशाला विघातक आहे. “देशात अराजकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून जनतेने अशा कृत्यांपासून सावध राहावे,” असेही ते म्हणाले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number