Santosh Deshmukh Case : ‘…तर 100 वाल्मिक कराड आणि त्यांच्या हजारो टोळ्या निर्माण होतील’; धनंजय देशमुखांचा मुंडेंवर हल्लाबोल

न्यायालयाच्या या निर्णयानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना 'न्यायाच्या दिशेने पहिलं ठोस पाऊल टाकलं गेलं आहे,' अशी प्रतिक्रिया दिली.<br/>

Santosh Deshmukh Case : ‘…तर 100 वाल्मिक कराड आणि त्यांच्या हजारो टोळ्या निर्माण होतील’; धनंजय देशमुखांचा मुंडेंवर हल्लाबोल

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेला त्याचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (17 डिसेंबर) नामंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना ‘न्यायाच्या दिशेने पहिलं ठोस पाऊल टाकलं गेलं आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.

याच वेळी, वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर धनंजय देशमुख यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणं म्हणजे शेकडो नव्या वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण करण्यासारखं आहे. अशा निर्णयामुळे टोळ्यांचं साम्राज्य वाढेल आणि निष्पाप लोकांचे बळी जातील,’ असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

हेही वाचा –  Manikrao Kokate: कोकाटेंची राजकीय कोंडी वाढली! कोर्टाने केले अटक वॉरंट जारी

दरम्यान, पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, ‘आज जो न्याय मिळतोय तो केवळ कागदावरचा नसून भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. माझ्या भावाचा खून करणाऱ्यावर राष्ट्रसंत भगवान बाबा जयंतीदिनी मकोका लावण्यात आला आणि मकोका कायदा करणारे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी या प्रकरणावर युक्तिवाद झाला, हे आम्हाला विशेष अर्थपूर्ण वाटतं.’

हेही वाचा – New Cyber Fraud: फोन उचलला पण समोरून शांतता…; Silent Calls म्हणजे सायबर स्कॅमर्सचा नवीन डाव?

तथापी, न्याय व्यवस्थेवर आपला ठाम विश्वास असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, ‘आजपासून आम्हाला न्याय मिळण्याची खरी सुरुवात झाली आहे.’ तसेच, जर धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यात आले तर आपल्यावर दबाव येण्याची शक्यता असल्याचा दावा करत, तसा लेखी अर्ज न्यायालयात सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही गुन्हेगारी टोळी कशी राजकीय आश्रयाखाली काम करत होती, हे सर्व पुराव्यानिशी उघड करणार, असा निर्धार व्यक्त करत धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number