Rajya Sabha Oath Ceremony: संसदेत घुमला महाराष्ट्राचा आवाज; शरद पवारांसह पाच दिग्गज नेत्यांनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ

राज्यसभेत आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवीन सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Rajya Sabha Oath Ceremony: संसदेत घुमला महाराष्ट्राचा आवाज; शरद पवारांसह पाच दिग्गज नेत्यांनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ

Rajya Sabha Oath Ceremony: देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच राज्यसभेत आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवीन सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह एकूण पाच नेत्यांचा समावेश होता. यावेळी ज्योती वाघमारेंच्या साडीने सर्वांचं लक्ष वेधलं. त्यांनी डोक्यावर पदत घेऊन शपथ घेतली. त्यांनी खास निळ्या रंगाच्या नऊवारी साडी नेसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवून आणलं. 

आज शपथ घेतलेले महाराष्ट्रातील सदस्य:
आज पार पडलेल्या सोहळ्यात खालील नेत्यांनी अधिकृतपणे खासदारकीची सूत्रे हाती घेतली:
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष)
रामदास आठवले (आरपीआय – महायुती)
माया ईवनाते (भाजप)
रामराव वडकुते (भाजप)
ज्योती वाघमारे (शिवसेना – शिंदे गट)

पार्थ पवार आणि विनोद तावडेंचा शपथविधी लांबणीवर
आजच्या सोहळ्यात काही प्रमुख नावे अनुपस्थित होती, त्यांचा शपथविधी आगामी काळात पार पडणार आहे:
विनोद तावडे: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे 10 एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
पार्थ पवार: राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदाच वरिष्ठ सभागृहात निवडून आलेले पार्थ पवार 9 एप्रिल रोजी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करतील.

हेही वाचा – Laxman Hake: ‘मला ताईंसह अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोन आले म्हणून मी…’; बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेताना लक्ष्मण हाकेंनी मांडली ओबीसींची व्यथा

राजकीय बलाबल: कोणाचे किती सदस्य?
नव्याने निवडून आलेल्या 7 सदस्यांमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. यामध्ये भाजपचे 3, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि आरपीआयचा प्रत्येकी 1 सदस्य आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार हे एकमेव प्रतिनिधी आहेत. नव्या सदस्यांच्या समावेशामुळे संसदेत महाराष्ट्राच्या प्रश्नांना अधिक ताकद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number