Amol Mitkari: ‘सीबीआय चौकशीतून सत्य समोर आलं पाहिजे’; अजित पवार विमान अपघाताप्रकरणी अमोल मिटकरींची मागणी

महाराष्ट्राच्या जनतेला या भीषण अपघातामागचे सत्य काय आहे, हे एकदा कळलेच पाहिजे, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली असून या मागणीमुळे आता तपासाच्या दिशेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.<br/>

Amol Mitkari: ‘सीबीआय चौकशीतून सत्य समोर आलं पाहिजे’; अजित पवार विमान अपघाताप्रकरणी अमोल मिटकरींची मागणी

Amol Mitkari: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या चौकशीवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीद्वारे सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला या भीषण अपघातामागचे सत्य काय आहे, हे एकदा कळलेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली असून या मागणीमुळे आता तपासाच्या दिशेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

जय पवार आणि पार्थ पवारांचीही तीच इच्छा
अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार या दोघांनाही आपल्या वडिलांच्या अपघाताचे नेमके कारण काय होते, हे जाणून घेण्याची इच्छा आहे. “उद्या महाराष्ट्राची जनता आम्हाला या घटनेबाबत प्रश्न विचारेल, त्यामुळे सत्य समोर येणे गरजेचे आहे. जय पवारांनी या संदर्भात आधीच भूमिका स्पष्ट केली असून, या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून ते पुढच्या आठवड्यात मुंबईत पत्रकारांशी संवाद साधतील,” अशी माहिती मिटकरी यांनी दिली.

डीजीसीए (DGCA) च्या अहवालावर प्रश्नचिन्ह?
विमान अपघातानंतर आलेला प्राथमिक अहवाल हा केवळ एक प्रोटोकॉल आहे, त्यावर कोणाचाही विश्वास असण्याचे कारण नाही, असे खळबळजनक विधान मिटकरी यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, “आदरणीय सुनेत्रा वहिनी (उपमुख्यमंत्री) देखील डीजीसीएचा सुधारित अहवाल आल्यानंतर आपली भूमिका मांडतील. मात्र, तोपर्यंत या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, ही आमच्या सर्व आमदारांची सामूहिक भावना आहे.”

हेही वाचा – MNS On Gas Shortage : गॅस तुटवड्याविरोधात मनसेचे अनोखं आंदोलन; नाल्यातून काढला गॅस अन्…

सत्य जनतेसमोर येणे गरजेचे
सध्याच्या तपास यंत्रणांच्या कामावर आणि तांत्रिक अहवालांवर पूर्णपणे विसंबून न राहता, केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी, असे मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. या अपघातामागे काही घातपात होता की केवळ तांत्रिक बिघाड, हे शोधणे राज्याच्या राजकारणासाठी आणि जनतेच्या समाधानासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number