Maharashtra IAS Transferred: राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच; आज पुन्हा 4 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी 4 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत.

Maharashtra IAS Transferred: राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच; आज पुन्हा 4 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली

Maharashtra IAS Transferred: राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी 4 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. गेल्या 2 आठवड्यांपासून प्रशासनात सुरू असलेले हे बदल्यांचे चौथे सत्र असून, बुधवारी आणि गुरुवारी सलग 2 दिवस अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र बदलण्यात आले आहे.

आजच्या महत्त्वाच्या बदल्या आणि नवीन जबाबदारी:
1) जी. श्रीकांत (2009 बॅच): नवी मुंबई येथील जल जीवन मिशनचे अभियान संचालक म्हणून कार्यरत असलेल्या जी. श्रीकांत यांची आता छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे.
2) जितेंद्र पापळकर (2010 बॅच): छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची मुंबई येथे जीएसटी सहआयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे.
3) गंगाथरण डी. (2013 बॅच): यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन (नवी मुंबई) या रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4) जगदीश मिनियार (2015 बॅच): सिडकोचे (छत्रपती संभाजीनगर) मुख्य प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या मिनियार यांची आता पुणे येथे महिला व बाल विकास विभागात नियुक्ती झाली आहे.

काल झालेल्या 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या एका दृष्टिक्षेपात – 

बुधवारी झालेल्या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पर्यटन विभाग आणि जिल्हा परिषदेच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला होता:
– डॉ. बी. एन. पाटील: पर्यटन संचालक, मुंबई वरून प्रकल्प संचालक, रुसा (उच्च व तंत्रशिक्षण) पदी बदली.
– मंगेश जोशी: 'यशदा'चे उपमहासंचालक आता मुंबईचे नवीन पर्यटन संचालक असतील.
– कुलदीप जंगम: सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत असलेले जंगम आता पिंपरी-चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त असतील.
– कुशल जैन: गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी आता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यभार सांभाळतील.
– रेवैया डोंगरे: धाराशिवचे सहायक जिल्हाधिकारी आता पांढरकवडा (यवतमाळ) येथे प्रकल्प अधिकारी (ITDP) म्हणून रुजू होतील.

हेही वाचा – Baramati Devansh Patharkar Speech :छोट्या पठ्ठ्याने अजितदादांवर केलं दमदार भाषण; रोहित पवारांसह उपस्थितांची जिंकली मनं

प्रशासकीय परंपरेची चर्चा
राज्यात सत्तेची सूत्रे हातात घेतल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीच्या दिवशी किंवा त्या आसपास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना सक्षम अधिकारी मिळावेत, या हेतूने हे फेरबदल केले जात असल्याचे बोलले जात आहे. या 2 दिवसांतील एकूण 9 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number