Shabbir Ansari Passes Away: OBC चळवळीचा बुलंद आवाज हरपला; दिग्गज नेते शब्बीर अन्सारी यांचे जालन्यात निधन

शब्बीर अन्सारी यांनी आपले संपूर्ण आयुष्य ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी समर्पित केले होते.

Shabbir Ansari Passes Away: OBC चळवळीचा बुलंद आवाज हरपला; दिग्गज नेते शब्बीर अन्सारी यांचे जालन्यात निधन

Shabbir Ansari Passes Away: ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे वयाच्या 79 व्या वर्षी दुःखद निधन झाले. जालन्यातील राहत्या घरी त्यांनी रविवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. विशेष म्हणजे, कालच त्यांनी कुटुंबीयांसोबत रमजान ईद साजरी केली होती, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री 9 वाजता जुना जालना येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक आणि विशेषतः ओबीसी चळवळीवर शोककळा पसरली आहे.

मंडल आयोगाचा निष्ठावान शिलेदार
शब्बीर अन्सारी यांनी आपले संपूर्ण आयुष्य ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी समर्पित केले होते. सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी उभ्या राहिलेल्या देशव्यापी आंदोलनाचा मुख्य आधारस्तंभ बनला. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातही ते अखेरपर्यंत सक्रिय राहिले. लक्ष्मण हाके यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, “मंडल आयोग आणि ओबीसींच्या देशपातळीवरील संघर्षाचा एक सच्चा शिलेदार आज आपल्यातून निघून गेला आहे, ही हानी कधीही भरून न येणारी आहे.”

छगन भुजबळांचा भावूक निरोप
राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शब्बीर अन्सारी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “शब्बीरभाई केवळ माझे सहकारी नव्हते, तर अनेक दशके खांद्याला खांदा लावून लढणारे माझे विश्वासू सोबती होते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अन्सारी यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. त्यांनी लिहिलेला ‘मंडलनामा’ हा ग्रंथ सामाजिक चळवळीचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून तो येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis: रुपाली चाकणकरांचा राजीनामा का घेतला? मुख्यमंत्री फडणवीसांनी अखेर सांगितलं खरं कारण

ऐतिहासिक कार्य आणि वारसा
शब्बीर अन्सारी यांनी केवळ आरक्षणाची मागणी केली नाही, तर जात आणि वर्ग यातील गुंतागुंतीचा फरक ओळखून मुस्लिम ओबीसींसाठी कायदेशीर लढा यशस्वी करून दाखवला. त्यांच्या कार्यामुळे हजारो कुटुंबांना आरक्षणाचे फायदे मिळाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर ओबीसी चळवळीचा एक चालता-बोलता इतिहास हरपला आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number