Shirur Panchayat Samiti Result : रिल्स गाजली, पण मतपेटीने साथ सोडली! निर्मला नवलेंचा शिरूरमध्ये भाजपच्या मनीषा पाचंगेंकडून पराभव

कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावरील क्वीन मानल्या जाणाऱ्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केला.

Shirur Panchayat Samiti Result : रिल्स गाजली, पण मतपेटीने साथ सोडली! निर्मला नवलेंचा शिरूरमध्ये भाजपच्या मनीषा पाचंगेंकडून पराभव

Shirur Panchayat Samiti Result : इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आणि रिल्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या निर्मला नवले यांना शिरूर पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावरील क्वीन मानल्या जाणाऱ्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केला. या निकालामुळे 'व्हर्च्युअल' लोकप्रियता आणि 'ग्राऊंड' रिॲलिटी यातील फरक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स, पण मतदानात पिछाडी
निर्मला नवले या केवळ राजकारणी नसून एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. आयटी इंजिनिअर असलेल्या नवलेंनी कारेगावचे सरपंचपद भूषवले होते. त्यांच्या स्टाईलिश रिल्स आणि भाषणांमुळे तरुणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कारेगाव-कान्हूर मेसाई गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) निवडणूक लढवताना त्यांना मतदारांची पूर्ण साथ मिळवता आली नाही. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव करत या हायव्होल्टेज लढतीत बाजी मारली.

पुणे जिल्हा परिषद; निकालाची सद्यस्थिती
अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात ही पहिलीच मोठी निवडणूक पार पडली. आज जाहीर झालेल्या सुरुवातीच्या 72 जागांच्या निकालात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे:

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 27 जागा (सर्वात मोठी आघाडी)
भारतीय जनता पक्ष: 20 जागा
शिवसेना (एकनाथ शिंदे): 07 जागा
राष्ट्रवादी (शरद पवार गट): 03 जागा
शिवसेना (ठाकरे गट): 02 जागा

हेही वाचा – Parbhani ZP Result: एक घर, पाच उमेदवार… चार जणांचा पराभव; परभणीत सुरेश वरपुडकरांचा बालेकिल्ला ढासळला

अजितदादांच्या निधनानंतर 'सहानुभूती'चा फॅक्टर?
पुणे जिल्ह्यात प्रचारादरम्यान कोणतीही मोठी सभा झाली नव्हती. मात्र, मतदानात राष्ट्रवादीला मिळालेले यश हे अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूती लाटेमुळे असल्याचे बोलले जात आहे. असे असूनही, निर्मला नवले यांच्यासारख्या मोठ्या चेहऱ्याचा पराभव होणे हा राष्ट्रवादीसाठी शिरूरमध्ये मोठा चिंतेचा विषय ठरला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number