Rohit Pawar: ‘जनता सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…’; बंगालमधील विजयावरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

भाजपने विजयाच्या उत्साहात लोकशाहीच्या मर्यादा ओलांडू नयेत, असा इशारा देतानाच रोहित पवारांनी या निकालांमागील काही गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.<br/>

Rohit Pawar: ‘जनता सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…’; बंगालमधील विजयावरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

Rohit Pawar:  तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “भाजपने विजयाच्या उत्साहात लोकशाहीच्या मर्यादा ओलांडू नयेत,” असा इशारा देतानाच त्यांनी या निकालांमागील काही गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

‘अँटी इन्कमबन्सी’चा फटका आणि SIR चा मुद्दा
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, तामिळनाडूमध्ये DMK आणि पश्चिम बंगालमध्ये TMC ची सत्ता पुन्हा येईल अशी अपेक्षा होती, परंतु दोन्ही राज्यांत सत्तेविरोधी लाटेचा (Anti-incumbency) फटका बसल्याचे दिसते. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, “गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालमध्ये 15 दिवस ठाण मांडले होते. तसेच, SIR (Special Intensive Revision) च्या माध्यमातून 90 लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्ग मोकळा करण्यात आला.”

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना इशारा
बंगालच्या विजयामुळे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या, तरी त्यांनी वास्तव विसरू नये, असे पवार म्हणाले. “जर आज देशात किंवा महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तर या पक्षांविरुद्धही तितकीच तीव्र अँटी इन्कमबन्सी आहे. जनता हाच निकष लावून त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

भाजपच्या राड्यावर तीव्र निषेध
निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर होण्यापूर्वीच बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा रोहित पवारांनी निषेध केला. “विजय मिळताच भाजपने TMC च्या कार्यालयांची तोडफोड करून आपल्या भावी कारभाराचा नमुना दाखवून दिला आहे. अजून निकालही स्पष्ट नाहीत तोच हे सुरू झाले आहे, भविष्यात बंगालच्या जनतेला आणखी काय काय भोगावे लागेल, हे देवच जाणे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Devendra Fadnavis: ‘मोदी हैं तर मुमकिन है..’; बंगालमधील विजयानंतर मुंबईत जल्लोष, मुख्यमंत्र्यांची ममतादीदींवर सडकून टीका

लोकशाहीसाठी घातक प्रवृत्ती
भाजपच्या या कृत्याचा निषेध करताना रोहित पवार यांनी याला लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. सत्तेच्या बळावर विरोधकांवर हल्ले करणे आणि मतदारांना डावलून निवडणुका जिंकणे ही संस्कृती देशाला कुठे नेणार, असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number