Ravindra Dhangekar: पुण्यात महायुतीचा खेळखंडोबा ! धंगेकर-भाजप वादामुळे शिंदे गटाचा स्वबळावर लढण्याचा नारा

रवींद्र धंगेकर आणि भाजप नेत्यांमधील जुन्या वैरामुळे युतीमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्षांमधील संभ्रम कायम राहिला.

Ravindra Dhangekar: पुण्यात महायुतीचा खेळखंडोबा ! धंगेकर-भाजप वादामुळे शिंदे गटाचा स्वबळावर लढण्याचा नारा

Ravindra Dhangekar: महापालिका निवडणुकीच्या रणांगणात पुण्यात महायुतीचे (भाजप-शिवसेना शिंदे गट) गणित पार विस्कटले आहे. रवींद्र धंगेकर आणि भाजप नेत्यांमधील जुन्या वैरामुळे युतीमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्षांमधील संभ्रम कायम राहिला. भाजपने धंगेकरांच्या प्रभागात एकही जागा सोडण्यास नकार दिल्याने युती आता केवळ कागदावरच उरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तथापी, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ‘पुण्यात महायुती तुटलेली नाही,’ असे जाहीर करत या वादावर पडदा टाकला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात केलेल्या विधानांमुळे गैरसमज पसरल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जागावाटप करताना थोडीफार खेचाखेच होतेच. जिथे शिवसेना जिंकू शकते अशा जागांवर आम्ही प्रबळ दावेदारी केली आहे. आता आम्ही सर्व पदाधिकारी मिळून एक प्रस्ताव तयार करू आणि तो मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडू.  

धंगेकरांची कोंडी करण्यासाठी भाजपची फिल्डिंग?

पुणे महापालिकेत शिवसेनेला (शिंदे गट) मिळणाऱ्या जागांवरून मोठा संघर्ष सुरू आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकर आग्रही होते, मात्र भाजपने तिथे उमेदवार देण्याची तयारी केल्याने धंगेकर संतप्त झाले आहेत. भाजप आपला पत्ता कट करत असल्याचे लक्षात येताच धंगेकरांनी आपल्या पत्नी आणि मुलासाठी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांशी संपर्क साधून धंगेकरांना उमेदवारी न देण्याबाबत शब्द टाकल्याने धंगेकरांचा हा पर्यायही बंद झाला.

हेही वाचा – Nashik Election 2026: AB फॉर्मवरून मोठा राडा!; भाजप शहराध्यक्षांच्या गाडीचा महामार्गावर पाठलाग; संतापलेल्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

युती की स्वबळ? गोंधळ सुरूच

आज सकाळपासूनच शिंदे गटाच्या गोटातून ‘युती तुटली’ अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. शिंदे गटाने स्वबळाची तयारी करत 165 उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, मंत्री उदय सामंत पुण्यात दाखल होताच त्यांनी ‘युती कायम’ असल्याचे जाहीर करत सारवासारव केली. दरम्यान, जागावाटपाचे हे त्रांगडे आता अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत असेच सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर आणि शहरातील भाजप नेत्यांमधील संघर्ष जगजाहीर आहे. याच कारणामुळे युतीच्या जागावाटपाच्या महत्त्वाच्या बैठकांपासून धंगेकरांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. भाजपने शिवसेनेला ज्या जागा देऊ केल्या आहेत, त्यात पुण्यातील मध्यवर्ती भागाचा (पेठांचा) समावेश नाही. भाजपकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे धंगेकर नाराज असून, जागांसाठी भाजपची लाचारी पत्करू नका, असा स्पष्ट पवित्रा त्यांनी शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे मांडला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number