IPL Final Venue : ‘या’ मैदानावरवर पुन्हा रंगणार महासंग्राम; IPL 2026 च्या प्ले ऑफ अन् फायनलचं ठिकाण ठरलं

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या हंगामातील प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे.

IPL Final Venue : ‘या’ मैदानावरवर पुन्हा रंगणार महासंग्राम; IPL 2026 च्या प्ले ऑफ अन् फायनलचं ठिकाण ठरलं

IPL Final Venue : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या हंगामातील प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. यंदाचा ग्रँड फिनाले 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने केवळ तारखाच नव्हे, तर ठिकाणांच्या बाबतीतही काही धक्कादायक आणि महत्त्वाचे बदल केले आहेत.

अहमदाबादमध्येच अंतिम सामना का?
नेहमीच्या प्रथेनुसार, गतविजेत्या संघाच्या (आरसीबी) घरच्या मैदानावर म्हणजेच बंगळुरूमध्ये अंतिम सामना होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या वर्षी आरसीबीच्या विजेतेपदानंतर झालेल्या जल्लोषात दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव आणि लॉजिस्टिक्सच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे बीसीसीआयने बंगळुरूऐवजी पुन्हा एकदा अहमदाबादच्या मैदानाची निवड केली आहे. यासह सलग दुसऱ्यांदा आणि गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा अहमदाबादला फायनलचे यजमानपद मिळाले आहे.

धर्मशाळा आणि न्यू चंदीगड
यंदाच्या प्ले-ऑफच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. धर्मशाळा येथे प्रथमच आयपीएल प्ले-ऑफचा सामना खेळवला जाणार आहे.

क्वालिफायर 1: गुणतालिकेतील पहिल्या दोन संघांमधील हा सामना 26 मे रोजी धर्मशाळेच्या नयनरम्य एचपीसीए स्टेडियमवर होईल.

एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2: हे दोन्ही महत्त्वाचे सामने न्यू चंदीगड येथील नवीन आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अनुक्रमे 27 आणि 29 मे रोजी पार पडतील.

 हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माला खेळण्यापासून रोखलं गेलं? मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधील 'त्या' खुलाशामुळे क्रिकेट विश्वात खळबळ

दरम्यान, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, स्थानिक परिस्थिती आणि सुरक्षेच्या नियमावलीचा विचार करूनच ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. आता क्रिकेट विश्वाचे लक्ष 26 मे पासून सुरू होणाऱ्या या 'बाद फेरी'कडे लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number