Kapil Sibal: ‘राज्यपाल भाजपचे हस्तक, विजय यांना निमंत्रित करा…’; तमिळनाडूतील सत्तासंघर्षावरून कपिल सिब्बल आक्रमक

तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना बहुमत नसल्याचे कारण देत निमंत्रण नाकारले होते. यावर प्रतिक्रिया देताना कपिल सिब्बल यांनी संताप व्यक्त केला.

Kapil Sibal: ‘राज्यपाल भाजपचे हस्तक, विजय यांना निमंत्रित करा…’; तमिळनाडूतील सत्तासंघर्षावरून कपिल सिब्बल आक्रमक

Kapil Sibal: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाचे प्रमुख विजय यांना राज्यपालांनी सुरुवातीला निमंत्रित न केल्याने वादाला तोंड फुटले. यावरून प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

राज्यपाल भाजपच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप
तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना बहुमत नसल्याचे कारण देत निमंत्रण नाकारले होते. यावर प्रतिक्रिया देताना कपिल सिब्बल यांनी संताप व्यक्त केला. “राज्यपाल हे भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत आणि सत्तेचा गैरवापर करून संविधानाची पायमल्ली करत आहेत,” असा थेट आरोप सिब्बल यांनी केला. सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय यांना आधी मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यायला हवी आणि त्यानंतर त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी, असे कायदेशीर मत सिब्बल यांनी मांडले.

सर्वात मोठा पक्ष म्हणून ‘TVK’ चा दावा
तमिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने पहिल्याच निवडणुकीत 108 जागा जिंकून सर्वांना धक्का दिला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या आकड्यापेक्षा त्यांचा पक्ष 10 जागा मागे आहे. मात्र, 108 जागांसह ते विधानसभेतील सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. गुरुवारी (7 मे 2026) विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. यावेळी त्यांनी आपल्याकडे आवश्यक पाठिंबा असल्याचे ठामपणे सांगितले.

बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांना आश्वासन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी राज्यपालांना विश्वासात घेतले असून, कोणत्या पक्षांचे आणि आमदारांचे त्यांना समर्थन आहे याची यादी सादर केली आहे. “मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आम्ही सभागृहात (फ्लोअरवर) आमचे बहुमत सहजपणे सिद्ध करू,” असे आश्वासन त्यांनी राज्यपालांना दिले. विजय यांच्या या सादरीकरणानंतर राज्यपालांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – तामिळनाडूतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’! अण्णाद्रमुकचे 25 आमदार बंडखोरीच्या मार्गावर; 5 स्टार रिसॉर्टमध्ये खलबतं

अखेर औपचारिक निमंत्रण मिळाल्याचे संकेत
सुरुवातीच्या वादानंतर आणि कपिल सिब्बल यांच्यासारख्या दिग्गजांनी कायदेशीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, राज्यपालांनी विजय यांच्या दाव्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. ताज्या माहितीनुसार, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. यामुळे तमिळनाडूमध्ये आता ‘थलापती’ विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number