Sanjay Raut On BJP: ‘भोंदू अशोक खरात हा भाजपचा प्रचारक…’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक आहे, अशा जळजळीत शब्दांत राऊतांनी टीका करत, या प्रकरणाला राजकीय वळण दिले आहे.

Sanjay Raut On BJP: ‘भोंदू अशोक खरात हा भाजपचा प्रचारक…’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On BJP: अघोरी कृत्ये आणि फसवणुकीच्या आरोपाखाली चर्चेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. “अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक आहे,” अशा जळजळीत शब्दांत राऊतांनी टीका करत, या प्रकरणाला राजकीय वळण दिले आहे. खरात प्रकरणावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असून राऊतांनी थेट गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.

इंटेलिजन्स केवळ विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी?
संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांना हे प्रकार आधीच माहीत असायला हवे होते. एखाद्या महिलेने तक्रार करेपर्यंत पोलीस कशाची वाट पाहत होते? राज्याचे इंटेलिजन्स (गुप्तचर खाते) केवळ विरोधकांवर पाळत ठेवण्यात सक्षम आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर तिथे समाजविघातक आणि अघोरी कृत्ये घडत होती, तर ती रोखण्यासाठी सरकारने वेळीच पावले का उचलली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मंत्रिमंडळातील सहभागावर गंभीर आरोप
अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांमध्ये मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आणि खासदार सहभागी असल्याचा खळबळजनक दावाही राऊतांनी केला आहे. “जर या अघोरी प्रकारांची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती, तर त्यांनी ते वेळीच थांबवायला हवे होते. तत्काळ धाडी टाकून हे प्रकार थांबवले असते, तर कदाचित अनेकांची प्रतिष्ठा आणि जीव वाचले असते. या संपूर्ण प्रकाराला सरकार तितकेच जबाबदार आहे,” असे राऊत यांनी ठामपणे मांडले.

हेही वाचा – Ratnagiri Passenger Train: कोकणवासीयांसाठी मनसे आक्रमक! ‘दादर-रत्नागिरी ट्रेन सुरू करा, नाहीतर…’; मनसेचा कडक इशारा

गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न
विधानसभेत काल सादर झालेल्या माहितीचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, “तुमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून माहिती होती असे तुम्ही सांगता, मग ही कृत्ये रोखली का नाही? तुम्ही याआधी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिला आहात, तरीही एका महिलेच्या तक्रारीची वाट का पाहत बसलात? हे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहे.” केवळ कारवाई करून भागणार नाही, तर हे प्रकार इतके दिवस का चालले, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी राऊतांनी लावून धरली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number