Ajit Pawar NCP Candidate List : मुंबईत अजित पवारांचा ‘एकला चलो रे’चा नारा ! 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 48 तास शिल्लक असताना पक्षाने 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, यात प्रामुख्याने नवाब मलिक यांच्या समर्थकांना आणि कुटुंबीयांना स्थान देण्यात आले आहे.<br/>

Ajit Pawar NCP Candidate List : मुंबईत अजित पवारांचा ‘एकला चलो रे’चा नारा ! 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Ajit Pawar NCP Candidate List :  बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election) राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीतून बाहेर पडत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 48 तास शिल्लक असताना पक्षाने 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, यात प्रामुख्याने नवाब मलिक यांच्या समर्थकांना आणि कुटुंबीयांना स्थान देण्यात आले आहे.

भाजपचा विरोध अन् राष्ट्रवादीचा स्वतंत्र पवित्रा

महायुतीमध्ये जागावाटपासाठी राष्ट्रवादीने शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र नवाब मलिक यांच्या नेतृत्वावरून भाजपने कडक भूमिका घेतली. मलिक यांच्याशी संबंधित कोणत्याही प्रस्तावाला भाजपने नकार दिल्याने अखेर राष्ट्रवादीने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिक यांना बाजूला करण्याऐवजी त्यांच्या कन्या आमदार सना मलिक यांच्याकडे मुंबईची सूत्रे सोपवून पक्षाने महायुतीला थेट आव्हान दिले आहे.

हेही वाचा – BMC Election 2025 : मुंबईत 'मविआ'चं नवं समीकरण! शरद पवार गट अखेर ठाकरे बंधूंसोबत; किती जागा मिळणार?

मलिक कुटुंबाचा दबदबा 

आमदार सना मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मलिक कुटुंबातील 3 सदस्यांचा समावेश आहे:

कप्तान मलिक (भाऊ): प्रभाग क्रमांक 165 मधून निवडणूक लढवणार.
डॉ. सईदा खान (बहीण): प्रभाग क्रमांक 168 मधून मैदानात.
बुशरा नदीम मलिक (कप्तान मलिक यांची सून): प्रभाग क्रमांक 170 मधून नशीब आजमावणार.

विशेष म्हणजे, कप्तान मलिक यांचा जुना प्रभाग (168) महिला राखीव झाल्याने त्यांनी स्वतःसाठी नवीन प्रभाग निवडला असून, जुन्या प्रभागातून सुनेला उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – BMC Election 2026 : शरद पवार गटाला मुंबईत मोठा सुरुंग ! 'या' बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

उद्यापासून 'AB फॉर्म'चे वाटप

दरम्यान, सना मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत राष्ट्रवादी एकूण 100 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांना उद्यापासूनच AB फॉर्म दिले जाणार आहेत. सामाजिक समतोल राखत पक्षाची ताकद असलेल्या प्रभागांवर लक्ष केंद्रित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांच्या गोटातही खळबळ

दुसरीकडे, शरद पवार यांची राष्ट्रवादी मुंबईत ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) यांच्यासोबत युती करून लढणार आहे. मात्र, या युतीत राष्ट्रवादीला केवळ 10 ते 12 जागाच मिळणार असल्याने 'तुतारी' चिन्हावर लढण्यास इच्छुक असलेले अनेक नेते आता अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना अनेक प्रभागांत पाहायला मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number