Ahmedabad Railway Station: अहमदाबादमध्ये उभं राहतंय देशातील सर्वात उंच 16 मजली रेल्वे स्टेशन; एकाच ठिकाणी मिळणार ‘या’ सर्व सुविधा

गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्टेशनचे संपूर्ण पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू असून, 16 मजली हे भव्य स्टेशन जुलै 2027 पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.<br/>

Ahmedabad Railway Station: अहमदाबादमध्ये उभं राहतंय देशातील सर्वात उंच 16 मजली रेल्वे स्टेशन; एकाच ठिकाणी मिळणार ‘या’ सर्व सुविधा

Ahmedabad Railway Station: देशात प्रथमच असा अत्याधुनिक मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारला जात आहे, जो प्रवासी सुविधांच्या दृष्टीने लंडन आणि पॅरिसच्या स्थानकांनाही टक्कर देईल. गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्टेशनचे संपूर्ण पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू असून, 16 मजली हे भव्य स्टेशन जुलै 2027 पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

स्टेशन कशामुळे विशेष ठरणार?

अहमदाबाद स्टेशनला केवळ आधुनिक रेल्वे स्थानक बनवण्यापेक्षा एक संपूर्ण ट्रान्सपोर्ट आणि व्यावसायिक केंद्र बनवण्याचा रेल्वेचा हेतू आहे. नवीन इमारत 16 मजली असेल आणि यात प्रशस्त पार्किंग, कार्यालयांची इमारत, व्यावसायिक क्षेत्र, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, हरित परिसर आणि बागा यांचा समावेश असेल. स्टेशनचे बाह्य आणि अंतर्गत डिझाइन शहराच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवणार आहे.

हेही वाचा – Most Expensive Number Plate : शौक बडी चीज है ! भारतातील 'या' राज्यात नंबरप्लेटसाठी मोजले कोट्यवधी रुपये, किंमत वाचून तुम्हालाही घाम फुटेल

सर्व सेवा एका छताखाली

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चारही प्रकारच्या वाहतूक सेवांची एकत्रित सुविधा. नवीन स्टेशनमध्ये रेल्वे, मेट्रो, बस सेवा, बुलेट ट्रेन एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवाशांना एका जागी सर्व परिवहन व्यवस्था मिळणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

मोदींच्या ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट’ संकल्पनेचा भाग

पश्चिम रेल्वेचे डीआरएम वेदप्रकाश यांनी सांगितले की, हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "संपूर्ण शहराला जोडणाऱ्या एकात्मिक परिवहन" या दूरदर्शी योजनेचा भाग आहे. स्टेशनला शहरातील प्रत्येक कोपऱ्यापर्यंत सहज संपर्क साधता आला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या प्रवासी संख्येचा अंदाज घेऊन हे स्टेशन भविष्यातील गरजांनुसार तयार केले जात आहे.

हेही वाचा – World's Tallest Statue of Lord Ram: पंतप्रधान मोदी 28 नोव्हेंबरला गोव्याच्या दौऱ्यावर! जगातील सर्वात उंच भगवान राम पुतळ्याचे करणार अनावरण

स्टेशनच्या आसपासचा परिसरही होणार आधुनिक

रेल्वेच्या माहितीनुसार नवीन रस्ते, बस, मेट्रो मार्ग, बुलेट ट्रेन कॉरिडॉर या सर्व सुविधांसह संपूर्ण परिसर विकसित केला जाईल. यामुळे अहमदाबादमध्ये एक नवीन आर्थिक व व्यावसायिक केंद्र निर्माण होईल. व्यापार, पर्यटन आणि स्थानिक रोजगार याला मोठी चालना मिळेल.

स्थानिकांमध्ये उत्सुकता

अनेक वर्षांनंतर अहमदाबाद शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक, बहुउद्देशीय रेल्वे स्टेशन मिळणार असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number