Abhijeet Dipke Parents Reaction: ’25 दिवस झाले लेकरं उपाशी आहेत…’; जंतर-मंतरवरील आंदोलनावरून अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचा सरकारवर निशाणा

या संपूर्ण घडामोडींवर आता अभिजीत यांच्या आई-वडिलांनी तीव्र भावना व्यक्त करत केंद्र सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे.<br/>

Abhijeet Dipke Parents Reaction: ’25 दिवस झाले लेकरं उपाशी आहेत…’; जंतर-मंतरवरील आंदोलनावरून अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचा सरकारवर निशाणा

Abhijeet Dipke Parents Reaction: दिल्लीतील जंतर-मंतर येथे लडाखच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवल्यानंतर, आता तरुण कार्यकर्ते अभिजीत दिपके यांनी त्याच ठिकाणी उपोषण सुरू केले आहे. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. या संपूर्ण घडामोडींवर आता अभिजीत यांच्या आई-वडिलांनी तीव्र भावना व्यक्त करत केंद्र सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे.

“20 तारखेची वाट पाहायची होती” – अभिजीत यांच्या आईची प्रतिक्रिया
अभिजीत दिपके यांच्या आईने पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, “सोनम सरांना आंदोलनस्थळावरून अचानक उचलून नेणे पूर्णपणे चुकीचे आहे. आंदोलन अतिशय सुरळीत आणि शांततेत सुरू होते. आगामी 20 तारीख महत्त्वाची होती, त्यानंतर सरकारने काय तो निर्णय घ्यायला हवा होता. गेल्या महिनाभरापासून मुले त्रस्त आहेत, २५ दिवस झाले विद्यार्थी इथे उपोषणाला बसले आहेत. मुलांचे हाल होत आहेत, तरीही सरकारमधील कोणीही जाऊन त्यांची दखल घेत नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, जर सरकारने केवळ योग्य पावले उचलली असती, तर ही वेळ आली नसती.

हेही वाचा – Sharad Pawar on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; केंद्र सरकारवर गंभीर आरोप

‘पंतप्रधानांना देवाने सद्बुद्धी द्यावी’ – वडिलांचा सरकारवर घणाघात
अभिजीत यांच्या वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शब्दांचे बाण चालवले. अत्यंत भावनिक आणि संतप्त स्वरात त्यांनी म्हटले, “मनुष्य हा पृथ्वीवरील सर्व सजीवांमध्ये श्रेष्ठ आणि विचार करण्याची क्षमता असलेला प्राणी आहे. मात्र, सरकारमध्ये बसलेल्यांना कुटुंब आणि मुलांची भावना समजत नाही का? देवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी द्यावी, जेणेकरून ते या आंदोलक मुलांचे ऐकून घेतील आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करतील.”

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईनंतर जंतर-मंतरवरील तणाव वाढला असून, अभिजीत दिपके यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवल्याने पालकांनी त्यांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number