Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने केलं स्वीकृत नगरसेवक; स्थानिकांमध्ये संतापाची लाट

काही महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर अत्याचार केला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर शहर पेटून उठले होते.

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने केलं स्वीकृत नगरसेवक; स्थानिकांमध्ये संतापाची लाट

Badlapur Case : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता. आता याच प्रकरणातील सहआरोपी आणि संबंधित शाळेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपने बदलापूर नगरपालिकेत ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून नियुक्त केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले असून जनसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमके प्रकरण काय?

काही महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर अत्याचार केला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर शहर पेटून उठले होते. नागरिकांनी रेल्वे रोको करत आरोपींना फाशीची मागणी केली होती. या प्रकरणात शाळेच्या व्यवस्थापनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा – PMC Election 2026 : पुणेकरांसाठी अजितदादांचं ‘हमीपत्र’, मेट्रोसह बसप्रवास मोफत; विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह फ्री ‘टॅब’

गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार आपटे अनेक दिवस फरार होते. अखेर 35 दिवसांनंतर ठाणे गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथील एका फार्महाऊसवरून अटक केली होती. सध्या या प्रकरणाचा खटला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. अशा गंभीर गुन्ह्यातील सहआरोपीला भाजपने थेट पालिकेत सन्मानाचे पद दिले आहे. पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपटे यांनी मोठी मदत केल्याचे कारण देत भाजपने या नियुक्तीचे समर्थन केले आहे.

हेही वाचा – Pune Election 2026 : पुण्यातील NCP च्या जाहीरनामा प्रकाशनावेळी अजित पवारांचा महेश लांडगेंना मिश्लिक टोला; म्हणाले, ‘तो मोठा नेता…’

सर्वत्र संतापाची लाट

ज्या शाळेत मुली सुरक्षित नव्हत्या, त्या शाळेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याला राजकीय पाठबळ मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप विरोधक आणि नागरिक करत आहेत. या निर्णयामुळे बदलापूरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number