Sanjay Raut Shivtirth Visit: राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट! खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असताना संजय राऊत थेट ‘शिवतीर्थ’वर

मुंबईतील घडामोडींचा केंद्रबिंदू आता 'मातोश्री'वरून थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानाकडे सरकला आहे.<br/>

Sanjay Raut Shivtirth Visit: राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट! खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असताना संजय राऊत थेट ‘शिवतीर्थ’वर

Sanjay Raut Shivtirth Visit: राज्यातील राजकीय घडामोडींनी आता अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय वळण घेतले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. आज संध्याकाळी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच ते पुढील निर्णय घेणार असल्याने सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, मुंबईतील घडामोडींचा केंद्रबिंदू आता 'मातोश्री'वरून थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानाकडे सरकला आहे.

पडद्यामागे मोठी खलबतं? संजय राऊतांची 'शिवतीर्था'वर अचानक एन्ट्री
ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षातील संभाव्य मोठ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आणि 'ऑपरेशन टायगर'च्या वाढत्या प्रभावादरम्यान झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वरकरणी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले, तरी ठाकरे गटाला बसलेल्या धक्क्यांनंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये काही नवीन समीकरणे आकाराला येत आहेत का? अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.

राऊत-राज ठाकरेंच्या भेटीने भुवया उंचावल्या
राजकीय गोटातून मिळणाऱ्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी संसदेत आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. या अत्यंत गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी थेट 'शिवतीर्थ' गाठल्याने राजकीय विश्लेषकही चक्रावले आहेत. ठाकरे गटातील या मोठ्या पडझडीला रोखण्यासाठी किंवा बदलत्या समीकरणांना तोंड देण्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा – Nagesh Patil Ashtikar : 'बोलण्याचा अतिरेक अन् अविश्वास…'ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या 'त्या' विधानानंतर हालचालींना वेग 

दरम्यान, या भेटीच्या अवघ्या एक दिवस आधी मनसेच्या एका जाहीर मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चौफेर टोलेबाजी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाढती जवळीक, तसेच यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात निर्माण झालेली अस्वस्थता यावर राज ठाकरेंनी थेट बोट ठेवले होते. या रोखठोक विधानानंतर लगेचच संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने या भेटीला आता विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number