Aditi Tatkare : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून लाखो महिलांची नावे कापली गेल्याच्या अफवांवर आता सरकारने पडदा टाकला आहे. राज्यभरात सध्या सर्व लाभार्थ्यांची ‘केवायसी’ (KYC) आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र महिलांना योजनेचे पैसे दिले जातील, असा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.
आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण –
लाडकी बहिणी योजनेबद्दल बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की, ‘अर्ज बाद झालेले नाहीयेत खरंतर महायुतीची एक सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लढवली याची एक केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या याच्यामध्ये जवळपास तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन दोन महिने दिला. असा आठ दहा महिन्यांचा कालावधीसाठी दिला होता. डीबीटीच्या योजना ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई केवायसीचा नाही. तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती आहे, अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे.’
दरम्यान, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर येथे माध्यमांशी बोलताना या प्रक्रियेची माहिती दिली. “योजनेतून कोणावरही अन्याय होणार नाही. केवळ पात्र आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचावा, यासाठी सध्या निकषांनुसार कडक पडताळणी केली जात आहे,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
राऊतांनी स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली वाहावी – विखे पाटलांचा पलटवार
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीवरून सध्या नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीने प्राजक्त तनपुरे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी तनपुरे यांच्यावर ‘राजकीय श्रद्धांजली’ अशी खोचक टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार घेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. विखे पाटील म्हणाले, “संजय राऊत यांनी दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा आधी स्वतःच्या पक्षाची अवस्था पाहावी. सध्या परिस्थिती अशी आहे की राऊतांना स्वतःच्याच पक्षाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे.”