Supriya Sule: ‘म्हणून त्यांना खोटं बोलावं लागतंय’; महिला आरक्षणावरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे वाचन करणारे आणि अभ्यासू नेते आहेत. पण...

Supriya Sule: ‘म्हणून त्यांना खोटं बोलावं लागतंय’; महिला आरक्षणावरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Supriya Sule: महिला आरक्षण विधेयक संसदेत फेटाळले गेल्याचा ठपका भाजपने विरोधकांवर ठेवल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना 'महिला विरोधी' ठरवत राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला होता. फडणवीसांच्या या भूमिकेचा समाचार घेताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांची चांगलीच फिरकी घेतली. "फडणवीसांना सर्व सत्य माहिती आहे, पण पक्षाची 'लाईन' जपण्यासाठी त्यांना वस्तुस्थितीचा विसर पडला आहे," असा टोला सुळे यांनी लगावला.

"दिल्लीची ब्रीफिंग नोट आणि राजकीय हतबलता"
सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना म्हटले की, "देवेंद्र फडणवीस हे वाचन करणारे आणि अभ्यासू नेते आहेत. 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे, याची त्यांना 100 नव्हे तर 2000 टक्के खात्री आहे. मात्र, एनडीएतील (NDA) पक्षांना दिल्लीतून जी 'ब्रीफिंग नोट' पाठवली जाते, त्याच आधारे त्यांना बोलावे लागते. दिल्लीच्या दबावामुळेच एका सुशिक्षित नेत्याला अशी राजकीय भूमिका घ्यावी लागत आहे, हे दुर्दैवी आहे."

अंमलबजावणीवरून सरकारला घेरलं
सुप्रिया सुळे यांनी यावेळेस तांत्रिक मुद्द्यांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी विचारले की, "20 सप्टेंबर 2023 ला संसदेने एकमताने हे विधेयक मंजूर केले आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली; मग 2026 उजाडले तरी त्याची अंमलबजावणी का झाली नाही?" लोकसभेच्या 543 जागांपैकी 33% जागा तातडीने महिलांसाठी राखीव करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, सरकार मतदारसंघ पुनर्रचनेचा (Delimitation) उगाच संबंध जोडून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा – Devendra Fadnavis: 2023 चा कायदा असताना पुन्हा विधेयक का? फडणवीसांनी विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर

चर्चेसाठी 'वेळ आणि जागा' तुमचीच!
देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांविरुद्ध रान उठवण्याची घोषणा केली होती. त्यांचे हे आव्हान स्वीकारताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांशी या विषयावर खुली चर्चा करायला मी कधीही तयार आहे. त्यांनी फक्त वेळ आणि जागा सांगावी, मी तिथे येऊन सविस्तर चर्चा करेन." विरोधकांनी महिलांच्या अधिकारांची 'भ्रूणहत्या' केल्याच्या फडणवीसांच्या आरोपावर सुळे यांनी ही सडेतोड भूमिका घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण आता अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number