Sahar Shaikh: "प्रभाग 30 मध्ये फिरताना दिसला तर…" मुंब्र्यात एमआयएमच्या विजयानंतर सहर शेख यांचा आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल

एकेकाळी जितेंद्र आव्हाडांचे खंदे समर्थक राहिलेले युनूस शेख आज त्यांचे कट्टर शत्रू म्हणून समोर आले आहेत. विजयी सभेत बोलताना युनूस शेख यांचा संताप अनावर झाला होता.

Sahar Shaikh: &quotप्रभाग 30 मध्ये फिरताना दिसला तर…&quot मुंब्र्यात एमआयएमच्या विजयानंतर सहर शेख यांचा आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल

ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 चे निकाल जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः मुंब्रा-कळवा या जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात एमआयएमने (MIM) जोरदार मुसंडी मारली असून, प्रभाग क्रमांक 30 मधून सहार शेख या तरुणीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) उमेदवारी नाकारल्यानंतर सहार शेख यांनी थेट असदुद्दीन ओवेसींच्या पतंगाची साथ धरली आणि 'तुतारी'चा आवाज मुंब्र्यात दाबून टाकला. या विजयानंतर आयोजित सभेत सहार आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका करत त्यांची थेट राजकीय 'विकेट' पाडण्याचे आव्हान दिले आहे.

एकेकाळी जितेंद्र आव्हाडांचे खंदे समर्थक राहिलेले युनूस शेख आज त्यांचे कट्टर शत्रू म्हणून समोर आले आहेत. विजयी सभेत बोलताना युनूस शेख यांचा संताप अनावर झाला होता. ते म्हणाले, "जितेंद्र आव्हाडांना 'जीजी' नाव मी दिले आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. पण आज त्याच जितेंद्र यांनी माझ्या मुलीच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उमेदवारी नाकारली म्हणून आम्ही थांबलो नाही. आज अल्लाहने माझ्या मुलीला 'हिजाबवाली बेटी' म्हणून जनतेच्या मनात स्थान दिले आहे. आव्हाडांनी लक्षात ठेवावे, इथून पुढे जर कुठल्या मुलीच्या करिअरमध्ये अडथळा आणला, तर आमचा समाज त्यांची राजकीय विकेट कशी पाडतो, हे त्यांना दिसेलच."

हेही वाचा: Railway Ticket Discount: ट्रेनने प्रवास करताय? 'या' ॲपचा वापर करून आता तिकीट काढा आणि सूट मिळवा

वडिलांप्रमाणेच सहार शेख यांनीही आपल्या भाषणात आक्रमक पवित्रा घेतला. आव्हाडांच्या कार्यपद्धतीवर प्रहार करताना त्या म्हणाल्या, "काहींना वाटले होते की आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आज आम्ही त्यांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या आहेत. आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे आणि आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही. प्रभाग 30 मधील जनतेने आव्हाडांच्या दहशतीला नाकारून लोकशाहीचा विजय केला आहे." सहर यांनी मुंब्र्यातील 'नोटा'च्या मतदानावर बोट ठेवत, तुतारीच्या उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक पसंती मिळणे ही आव्हाडांची मोठी हार असल्याचे नमूद केले.

भाषण ओघात सहार शेख यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका केली. "एका वाघाच्या बच्चाला हरवण्यासाठी त्यांनी संपूर्ण फौज मैदानात उतरवली होती, पण सत्य आणि प्रामाणिकपणासमोर त्यांची कोणतीही खेळी चालली नाही," असे त्या म्हणाल्या. मुंब्र्यातील राजकीय समीकरणांमध्ये या निकालामुळे मोठी उलथापालथ झाली असून, आगामी पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा 'हिरव्या रंगात' रंगवण्याचा निर्धारही सहार शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंब्र्यातील वर्चस्वाची लढाई आता चव्हाट्यावर मुंब्रा परिसरात आव्हाडांविरुद्ध वाढलेली नाराजी आणि युनूस शेख यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांनी घेतलेली बंडखोर भूमिका, हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निवडणुकीपूर्वीचा तो वाद आणि आता हा संघर्ष आता पालिका सभागृहापर्यंत पोहोचला आहे. प्रभाग 30 मध्ये फिरताना दिसलात तर गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा युनूस शेख यांनी दिल्यामुळे मुंब्र्यात आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: LPG-Aadhaar Link : गॅस सबसिडी हवीये? मग तातडीने करा आधार-LPG गॅस लिंक; अन्यथा होईल आर्थिक नुकसान, पाहा संपूर्ण प्रक्रिया

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number