Uddhav Thackeray: शिवाजी पार्कातील विजयसभेतून ठाकरेंकडून गडकरींचा ‘खड्डा मंत्री’ उल्लेख; इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत नेमकं काय म्हणाले?

या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध एकत्र आलेल्या नागरिकांचे मनापासून आभार मानले.

Uddhav Thackeray: शिवाजी पार्कातील विजयसभेतून ठाकरेंकडून गडकरींचा ‘खड्डा मंत्री’ उल्लेख;  इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray: NEET परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर-मंतरवर महिनाभरापासून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर दादरच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंच्या (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) उपस्थितीमध्ये एका भव्य विजयसभेचे आयोजन करण्यात आले. आधी या आंदोलनानिमित्त शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र केंद्र सरकारने नमते घेत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारल्याने या मोर्चाचे रुपांतर जल्लोष सभेत करण्यात आले.

‘भाजप विरुद्ध भारत’ संघर्षाची ही तर सुरुवात: उद्धव ठाकरे
या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध एकत्र आलेल्या नागरिकांचे मनापासून आभार मानले. “हा विजय कोणत्याही निवडणुकीतील विजय नसून अंधभक्तांविरुद्ध देशभक्तांनी मिळवलेला मोठा ऐतिहासिक विजय आहे,” असे त्यांनी नमूद केले. देशवासीयांनी जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन ‘भारतीय’ म्हणून दिलेला हा लढा म्हणजेच ‘भाजप विरुद्ध भारत’ अशा संघर्षाची सुरुवात असल्याचे ते म्हणाले. एका सामान्य संघटित ताकदीने अखेर हुकूमशाही वृत्तीला झुकण्यास भाग पाडले, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी नितीन गडकरी याचा उल्लेख ‘खड्डा मंत्री’ असा केला. ते म्हणाले, ‘आपले खड्डामंत्री, रस्तामंत्री ते इथेनॉलवरती बोलत आहेत. हा या पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे अनेक वाहनांचे मायलेज कमी झाले आहे. देखभाल खर्च वाढला आहे.’ 

मंत्र्यांना पक्ष फोडण्यापेक्षा देशाच्या कामात लावा – केंद्र सरकारवर कडक टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी आता तरी देशातील गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. केंद्रीय मंत्री सरकार चालवण्याऐवजी इतर पक्ष फोडण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थमंत्री महागाई व रुपयाच्या घसरणीवर गप्प आहेत, तर संरक्षण मंत्री आणि रस्ते वाहतूक मंत्री मूळ प्रश्न सोडून सहकाऱ्यांचा बचाव करण्यात गुंतले आहेत. शिक्षण मंत्र्यांना पदावरून हटवताना सरकारला जितक्या वेदना झाल्या, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त यातना पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना झाल्या आहेत, असे भावूक उद्गार त्यांनी काढले.

सोशल मीडियावरील धमक्यांना कृतीने उत्तर देण्याचे आवाहन
निवडणुकांपेक्षा देश वाचवणे आणि पेटलेली ही अन्यायाविरुद्धची ठिणगी कायम ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “मशीनद्वारे मते चोरता येतील, पण जनतेचे मन चोरता येत नाही,” असे सांगत त्यांनी सोशल मीडियावर आंदोलक विद्यार्थ्यांना धमक्या देणाऱ्या अंधभक्तांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. अशा प्रवृत्तींचे व्हिडिओ समोर आणून त्यांना योग्य धडा शिकवण्याचे आवाहन करत, तरुणांच्या या अभूतपूर्व एकजुटीची नोंद इतिहासात सुवर्णअक्षरांनी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number