Sandeep Deshpande : ‘ठाकरे हा ब्रँड नाही, तर विचार आहे…’; ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत संदीप देशपांडेंचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

ठाकरे बंधूंच्या एकत्र व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य असल्याचे सांगत देशपांडे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवला.<br/>

Sandeep Deshpande :  ‘ठाकरे हा ब्रँड नाही, तर विचार आहे…’; ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत संदीप देशपांडेंचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

Sandeep Deshpande :  मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात आज राजकारणतला एक अभूतपूर्व सोहळा पार पडत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची संयुक्त सभा पार पडत आहे. या सभेची सुरुवात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या तुफानी भाषणाने झाली. ठाकरे बंधूंच्या एकत्र व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य असल्याचे सांगत देशपांडे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवला.

ठाकरे ब्रँड की विचार? 

लोक म्हणतात ठाकरे ब्रँड संपला, पण त्यांना मला सांगायचे आहे की ठाकरे हा ब्रँड नाही, तर तो एक विचार आहे आणि विचार कधीच संपत नसतो. तुमचा गुजरातचा तो 'ब्रँड' आहे, जो 10 वर्षे वापरून लोक कंटाळले आहेत. कोलगेट संपल्यावर लोक जसे पेप्सोडेंट वापरतात, तसाच बदल आता लोक करणार आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपला टोला लगावला.

लाडकी बहीण योजनेवर प्रहार 

राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेचा समाचार घेताना देशपांडे म्हणाले, 'निवडणुका आल्या की यांना बहिणी आठवतात. आधी नुसत्या बहिणी होत्या, आता त्या लाडक्या झाल्या आहेत. 13 तारखेला पैसे टाकणार म्हणतात, आचारसंहिता फक्त आमच्यासाठी आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  

मराठी अस्मिता आणि 56 इंची छाती

संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की, आम्ही तिघे इथे गोट्या खेळायला एकत्र आलो नाही, तर मराठी माणसाच्या सत्तेसाठी एकत्र आलो आहोत. आम्ही मराठी आहोत आणि आमची 56 इंच छाती आहे, असे ठणकावून सांगत देशपांडे यांनी मुंबईतील मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला. या मुंबईत पुन्हा मराठी महापौरच बसणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Raj-Uddhav Sabha On Shivtirth : 'जे नाराज होऊन गेले आहेत, ते परत येतील'; राज ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

अण्णामलाई यांना इशारा 

दरम्यान, भाजप नेते अण्णामलाई यांच्यावर टीका करताना देशपांडे म्हणाले, काल-परवा ते अण्णामलाई लुंगी डॅन्स करत आले होते. त्यांना सांगायचे आहे की इथे येऊन शहाणपण शिकवू नका, नाहीतर 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' करायला आम्हाला वेळ लागणार नाही. 

हेही वाचा – Eknath Shinde : 'मी शेतात गेलो तरी आणि दिल्लीत गेलो तरी पोट दुखते'; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

पालिका भरती आणि बेस्टचे विलीनीकरण
 
मुंबई महानगरपालिकेतील रिक्त जागांवरून प्रशासनावर टीका करताना त्यांनी सांगितले की, पालिकेत 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्या भरल्या तर 1 लाख तरुणांना रोजगार मिळेल. तसेच 'बेस्ट'ची अवस्था बिकट असून तिचे पालिकेत विलीनीकरण केल्याशिवाय कामगारांना न्याय मिळणार नाही, असेही ते म्हणाले. शेवटी, 'पावले जरी असंख्य पोचते मराठी, आपल्याच घरी हाल सोसते मराठी… शेवटी मधांध तख्त फोडते मराठी' या कवितेच्या ओळी सादर करत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number