Uddhav Thackeray Strategy: कामगार संघटनांतील संघर्ष तीव्र; ठाकरे गटाने संघटना मजबूत करण्यासाठी सुरू केली खास मोहीम

दोन दिवसांपूर्वी वरळीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर आता ठाकरे गट अधिक सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. <br/>

Uddhav Thackeray Strategy: कामगार संघटनांतील संघर्ष तीव्र; ठाकरे गटाने संघटना मजबूत करण्यासाठी सुरू केली खास मोहीम

Uddhav Thackeray Strategy: मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या हालचाली दिसू लागल्या आहेत. युतीनंतरचा प्रभाव वाढवण्यासाठी भाजपने शिवसेना ठाकरे गटावर थेट दबाव आणण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. विशेषतः कामगार संघटनांच्या पातळीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढताना दिसतो आहे. दोन दिवसांपूर्वी वरळीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर आता ठाकरे गट अधिक सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

गेल्या काही महिन्यांत कामगार सेनेत आणि भाजपच्या नव्याने तयार झालेल्या कामगार संघटनेत वाद वाढत चालला आहे. पारंपरिकपणे विविध उद्योग, सेवा क्षेत्र आणि कंपन्यांमध्ये कामगारांच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या कामगार सेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपकडून स्वतंत्र यूनियन उभ्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी तर भाजपने ठाकरे गटाच्या संघटनेला मागे टाकत आपली पकड बसवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – Maharashtra Winter Session: महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहिलीच वेळ; दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता अनुपस्थित

कामगार सेना ही शिवसेना संघटनात्मक संरचनेचा मजबूत आधारस्तंभ मानली जाते. हॉटेल्सपासून ते विमानतळ, आणि कंपन्यांपासून ते कारखान्यांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये असलेली तिची उपस्थिती ही शिवसेनेच्या स्थानिक बळकटीची प्रमुख कारणे आहेत. मात्र भाजपने या क्षेत्रात प्रवेश करताच कामगार चळवळ राजकीय स्पर्धेच्या केंद्रस्थानी आली आहे. यामुळे ठाकरे गटाने सतर्क राहण्याचे ठरवले असून, संघटनेची शिस्त, अंतर्गत बांधणी आणि नव्या कार्यक्रमांवर स्वतः लक्ष देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

हेही वाचा – Maharashtra Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशन उद्यापासून; सरकार आणि विरोधकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर गरम वातावरण?

या पार्श्वभूमीवर मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. कामगार सेनेतील प्रमुख पदाधिकारी, स्थानिक प्रमुख आणि संबंधित जबाबदारांना या बैठकीसाठी विशेषतः निमंत्रित करण्यात आले आहे. संघटना बळकट करण्यासाठी आवश्यक असणारे बदल, सदस्यसंख्या वाढविण्याची आगामी योजना, कामगारांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका आणि भाजपच्या नव्या रणनीतीला कसे प्रत्युत्तर द्यायचे यावर विस्तृत चर्चा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कामगार संघटनांच्या पातळीवर वाढणारी राजकीय स्पर्धा लक्षात घेता, ठाकरे गटाची ही बैठक शिवसेनेतील संघटनात्मक बदलांची सुरुवात मानली जात आहे. कारण कामगार सेनेतील कमकुवतपणाचा थेट परिणाम स्थानिक राजकारणावर होऊ शकतो. त्यामुळेच कामगार क्षेत्रात भाजपचे वाढते पाऊल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः हस्तक्षेप करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number