Death Threat to UBT Leader: ठाकरे गटाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; अज्ञात नंबरवरून सलग चार दिवस मध्यरात्री धमक्यांचे फोन

गेल्या तीन-चार दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना सातत्याने फोन करून अश्लील भाषेत धमकावले जात असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Death Threat to UBT Leader: ठाकरे गटाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; अज्ञात नंबरवरून सलग चार दिवस मध्यरात्री धमक्यांचे फोन

Death Threat to Shiv Sena UBT Leader: शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना सातत्याने फोन करून अश्लील भाषेत धमकावले जात असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दानवे यांनी अखेर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली असून, अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

मध्यरात्रीचे फोन आणि ‘कापून टाकण्याची’ भाषा
दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा त्रासाचा प्रकार 12 मार्च पासून सुरू झाला होता. अज्ञात क्रमांकावरून त्यांना सतत फोन येत होते, मात्र 15 मार्च रोजी या प्रकाराने टोक गाठले. रात्री 1 वाजून 54 मिनिटांनी आलेल्या फोनवरून “तुला कापून टाकू, ठोकून टाकू” अशी थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुरुवातीला याकडे राजकीय आयुष्यातील नेहमीचा भाग म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या दानवे यांनी, सलग चौथ्या दिवशीही हाच प्रकार सुरू राहिल्याने कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

सुरक्षेचा प्रश्न आणि पोलिसांत धाव
विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या महिन्यातच अंबादास दानवे यांची सरकारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. अशा असुरक्षित परिस्थितीत येत असलेल्या धमक्यांमुळे त्यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून, क्रांती चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. “मी धमक्यांना घाबरत नाही, पण मध्यरात्री वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे खबरदारी म्हणून तक्रार केली आहे,” अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Nana Patole: गॅस तुटवड्यावरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळेंनंतर आता नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; सभागृहात मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार

तपासाची चक्रे फिरली  
अंबादास दानवे यांनी ज्या नंबरवरून धमक्या आल्या, तो संबंधित फोन नंबर पोलिसांना सुपूर्द केला आहे. तो नंबर नेमका कोणाचा आहे आणि त्यामागे एखादी राजकीय कटकारस्थाने आहेत का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. एका वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारे मध्यरात्री फोन करून धमकावले गेल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या चर्चेला उधाण आले असून, आरोपीला लवकर अटक करण्याची मागणी शिवसैनिकांकडून होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number