Joint Protest In Mumbai: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ‘या’ तारखेला मुंबईत धडकणार संयुक्त मोर्चा

या महामोर्चाची संपूर्ण रूपरेषा आणि पुढील रणनीती स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत.

Joint Protest In Mumbai: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ‘या’ तारखेला मुंबईत धडकणार संयुक्त मोर्चा

Joint Protest In Mumbai: शैक्षणिक गोंधळ आणि दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र येत रस्त्यावर उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी येत्या 26 तारखेला मुंबईत भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महामोर्चाची संपूर्ण रूपरेषा आणि पुढील रणनीती स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. यापूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या दोन्ही ठाकरे बंधूंचे आता विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र येणे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर येथे अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निदर्शनांना पाठिंबा दर्शवत ठाकरे बंधूंनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र निशाणा साधला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न घेणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावर मौन बाळगल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. या आंदोलनाला मिळालेल्या हिंसक वळणानंतर मुंबईत निघणाऱ्या या संयुक्त मोर्च्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – Pratibha Pawar meets Sonia Gandhi: पवार कुटुंबाच्या राजकीय हालचाली; शरद पवार – मोदी भेटीनंतर प्रतिभा पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

यापूर्वी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबईतील दादर शिवतीर्थावर जमलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी तरुणांच्या या एकत्रित ताकदीचे कौतुक केले. दिल्लीत प्रशासनाने आंदोलकांवर लाठीचार्ज केला असला तरी मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमी भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले. कोणत्याही राजकीय फायद्यापेक्षा देशाचे नागरिक म्हणून एकत्र येत वंदे मातरम् च्या घोषणा देणाऱ्या या युवाशक्तीच्या पाठीशी दोन्ही पक्ष ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number