BMC Election 2025 : मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता? ठाकरे बंधूंची युती पण, आकडेवारी कोणाच्या बाजूने; सर्व्हेमध्ये मोठा खुलासा

या पार्श्वभूमीवर, 'व्होट वाईब इंडिया'चे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा कल तपासून मुंबई पालिकेचे संभाव्य चित्र मांडले आहे.<br/>

BMC Election 2025 : मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता? ठाकरे बंधूंची युती पण, आकडेवारी कोणाच्या बाजूने; सर्व्हेमध्ये मोठा खुलासा

BMC Election 2025 :  राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी 24 डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आणि मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता 'ठाकरे बंधू विरुद्ध महायुती' असा थेट सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर, 'व्होट वाईब इंडिया'चे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा कल तपासून मुंबई पालिकेचे संभाव्य चित्र मांडले आहे.

विधानसभेच्या आकडेवारीतून महापालिकेचा अंदाज

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुंबईत बाजी मारली होती. 36 पैकी 22 जागांवर महायुतीने विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला 14 जागांवर समाधान मानावे लागले. मुंबईतील एकूण 227 प्रभागांचा विचार केल्यास महायुती 133 प्रभागांमध्ये आघाडीवर होती. तर महाविकास आघाडी 94 प्रभागांमध्ये वरचढ होती.

हेही वाचा – BJP Nashik : भाजपमधील 'इनकमिंग'मुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदें भावुक

काय आहे 'जादुई आकडा' गाठण्याचे समीकरण?

मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. अमिताभ तिवारी यांच्या विश्लेषणानुसार, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) आघाडी घेताना दिसत असून त्यांना बहुमताचा म्हणजेच 114 जागांचा जादुई आकडा गाठता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, प्रथमच एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (ठाकरे बंधू) यांच्या युतीला 79 जागांपर्यंत मजल मारता येईल, असे चित्र दिसत आहे. या राजकीय लढाईत काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे 19 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागू शकते. याशिवाय, मुंबईतील उर्वरित 10 जागा इतर लहान पक्ष किंवा अपक्ष उमेदवारांच्या खात्यात जाण्याचा अंदाज या आकडेवारीवरून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – Meenakshi Shinde : बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

काठावरची बहुमत आणि ठाकरे बंधूंचे आव्हान

या आकडेवारीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना बहुमताचा 114 हा नेमका आकडा गाठताना दिसत आहे. मात्र, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मतदारांच्या मानसिकतेत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र होते, पण आता मुंबईत समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंची ही युती महायुतीचा विजयरथ रोखणार की महायुती पुन्हा एकदा मुंबईवर भगवा फडकवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number