Team India Schedule: नवीन वर्षाची सुरुवात भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. जानेवारी 2026 मध्ये भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार असून या महिन्यात एकूण 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्ध रंगणार वनडे मालिका
वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेपासून होईल.
11 जानेवारी: पहिला सामना (बडोदा)
14 जानेवारी: दुसरा सामना (राजकोट)
18 जानेवारी: तिसरा सामना (इंदूर)
या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरणार असून, चाहत्यांना त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. बीसीसीआय निवड समिती येत्या शनिवार-रविवारपर्यंत या मालिकेसाठी संघ जाहीर करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Indian Women Cricket: ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर खेळाडूची जागा घेणार मराठमोळी सायली सातघरे
5 सामन्यांची टी-20 मालिका: विश्वचषकाची रंगीत तालीम
फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वीची ही शेवटची 'ड्रेस रिहर्सल' असेल. त्यामुळे या 5 सामन्यांच्या मालिकेवर सर्वांचे लक्ष असेल.
21 जानेवारी: पहिला टी-20 (नागपूर)
23 जानेवारी: दुसरा टी-20 (रायपूर)
25 जानेवारी: तिसरा टी-20 (गुवाहाटी)
28 जानेवारी: चौथा टी-20 (विशाखापट्टणम)
31 जानेवारी: पाचवा टी-20 (तिरुवनंतपुरम)
हेही वाचा – Virat Kolhi: विराट-अनुष्काचा क्युट फोटो आणि तासात 40 लाख लाईक्स; 2026 ची 'विराट'सुरुवात
फेब्रुवारीत विश्वचषकाचा थरार
जानेवारीतील या 8 सामन्यांनंतर भारतीय संघ थेट टी-20 विश्वचषकाच्या रणांगणात उतरेल. 7 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे. गतविजेता असलेला भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.