India vs New Zealand Schedule : जानेवारी ठरणार सुपर हिट ! भारतीय संघ जानेवारीत खेळणार 8 सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार असून या महिन्यात एकूण 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत.

India vs New Zealand Schedule : जानेवारी ठरणार सुपर हिट ! भारतीय संघ जानेवारीत खेळणार 8 सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule: नवीन वर्षाची सुरुवात भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. जानेवारी 2026 मध्ये भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार असून या महिन्यात एकूण 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्ध रंगणार वनडे मालिका

वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेपासून होईल.

11 जानेवारी: पहिला सामना (बडोदा)

14 जानेवारी: दुसरा सामना (राजकोट)

18 जानेवारी: तिसरा सामना (इंदूर)

या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरणार असून, चाहत्यांना त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. बीसीसीआय निवड समिती येत्या शनिवार-रविवारपर्यंत या मालिकेसाठी संघ जाहीर करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Indian Women Cricket: ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर खेळाडूची जागा घेणार मराठमोळी सायली सातघरे

5 सामन्यांची टी-20 मालिका: विश्वचषकाची रंगीत तालीम

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वीची ही शेवटची 'ड्रेस रिहर्सल' असेल. त्यामुळे या 5 सामन्यांच्या मालिकेवर सर्वांचे लक्ष असेल.

21 जानेवारी: पहिला टी-20 (नागपूर)

23 जानेवारी: दुसरा टी-20 (रायपूर)

25 जानेवारी: तिसरा टी-20 (गुवाहाटी)

28 जानेवारी: चौथा टी-20 (विशाखापट्टणम)

31 जानेवारी: पाचवा टी-20 (तिरुवनंतपुरम)

हेही वाचा – Virat Kolhi: विराट-अनुष्काचा क्युट फोटो आणि तासात 40 लाख लाईक्स; 2026 ची 'विराट'सुरुवात

फेब्रुवारीत विश्वचषकाचा थरार

जानेवारीतील या 8 सामन्यांनंतर भारतीय संघ थेट टी-20 विश्वचषकाच्या रणांगणात उतरेल. 7 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे. गतविजेता असलेला भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number