India vs Sri Lanka U19 Women: श्रीलंकेला भिडणार टीम इंडिया; BCCI ने जाहीर केला भारताचा U-19 महिला संघ, ‘या’ खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद

बीसीसीआयने (BCCI) आगामी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी भारताच्या 19 वर्षांखालील (U-19) महिला संघाची घोषणा केली आहे.

India vs Sri Lanka U19 Women: श्रीलंकेला भिडणार टीम इंडिया; BCCI ने जाहीर केला भारताचा U-19 महिला संघ, ‘या’ खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद

India vs Sri Lanka U19 Women: भारतीय महिला क्रिकेटच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. बीसीसीआयने (BCCI) आगामी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी भारताच्या 19 वर्षांखालील (U-19) महिला संघाची घोषणा केली आहे. या मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये अनेक नवोदित आणि गुणवान महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रीलंका संघाविरुद्धच्या या दौऱ्यात एकूण 6 सामने खेळवले जाणार असून, बीसीसीआयने टी-20 (T20I) आणि एकदिवसीय (ODI) अशा दोन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र संघ जाहीर केले आहेत. या संपूर्ण दौऱ्यात चेन्नईच्या मैदानावर 3 टी-20 सामने, तर पुद्दुचेरीमध्ये 3 एकदिवसीय सामने आयोजित करण्यात आले आहेत.

भाविका अहिरेकडे कर्णधारपद, तर महक नरवासे उपकर्णधार
निवडकर्त्यांनी या महत्त्वाच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज भाविका अहिरे हिच्यावर मोठा विश्वास दाखवत दोन्ही संघांच्या कर्णधारपदाची धुरा तिच्या खांद्यावर सोपवली आहे. ज्युनियर लेव्हलवरील क्रिकेटमधील तिची उत्कृष्ट कामगिरी आणि उत्तम नेतृत्वक्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तिच्या जोडीला दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार म्हणून महक नरवासे हिची नियुक्ती करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकणाऱ्या इरा जाधव, ईश्वरी अवसरे, पूर्वा सिवाच, कुमारी पालक, काश्वी कंदिकुप्पा, गौरी गोयल, जान्हवी विरकर आणि अनादी तागडे या युवा खेळाडूंना दोन्ही संघांमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे.

टी-20 मालिकेसाठीचा भारतीय U-19 संघ (T20I Squad)
भाविका अहिरे (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इरा जाधव, तनिष्का शर्मा, ईश्वरी अवसरे, अवनी चावडा, निधी महातो, पूर्वा शिवच, कुमारी पलक, महक नरवासे (उपकर्णधार), काश्वी कंदिकुप्पा, गौरी गोयल, जान्हवी विरकर, अनादी तागडे, के दीक्षा (यष्टीरक्षक).

एकदिवसीय मालिकेसाठीचा भारतीय U-19 संघ (ODI Squad)
भाविका अहिरे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), इरा जाधव, दिया यादव, ईश्वरी अवसरे, व्ही प्रतीक्षा, निधी महातो, पूर्वा शिवच, कुमारी पलक, महक नरवासे (उपकर्णधार), काश्वी कंदिकुप्पा, गौरी गोयल, जान्हवी विरकर, अनादी तागडे, के दीक्षा (यष्टीरक्षक).

हेही वाचा – FIFA World Cup 2026 : भारतीय फुटबॉल संघाचे स्वप्न अधुरे, पण ‘या’ 4 देशांकडून मैदानात उतरणार भारतीय वंशाचे खेळाडू

मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक (Match Schedule)
निवडकर्त्यांनी टी-20 च्या वेगवान फॉरमॅटसाठी आणि एकदिवसीय सामन्यांच्या 50 षटकांच्या गरजेनुसार संघात योग्य समतोल साधला आहे. या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्यासाठी ही मालिका मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

टी-20 मालिकेचे वेळापत्रक (चेन्नई):

22 जून: पहिला T20 सामना
24 जून: दुसरा T20 सामना
27 जून: तिसरा T20 सामना

एकदिवसीय (ODI) मालिकेचे वेळापत्रक (पुद्दुचेरी):

30 जून: पहिली वनडे मॅच
3 जुलै: दुसरी वनडे मॅच
6 जुलै : तिसरी वनडे मॅच
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number