Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला आहे. सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगम (TVK) पक्षाला विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK) ने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमतासाठी आवश्यक असलेला ‘मॅजिक फिगर’ पार केला असून, राज्यात आता ‘थलपती’ सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जादुई आकडा पार
तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत, जिथे बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता आहे. विजय यांच्या TVK ने स्वबळावर 108 जागा जिंकल्या होत्या. आता काँग्रेस, माकप (CPI-M), भाकप (CPI) आणि अखेर VCK च्या पाठिंब्यामुळे त्यांच्याकडे बरोबर 118 आमदारांचे संख्याबळ झाले आहे.
Tamil Nadu | VCK extends unconditional support to TVK to form a government in the state. With this, TVK now has the support of Congress, CPI, CPI(M) and VCK, taking its tally to 119, crossing the majority mark of 118. pic.twitter.com/iWK69ncqHq — ANI (@ANI) May 9, 2026
राज्यपालांची भेट
दरम्यान, TVK चे शिष्टमंडळ आज, 9 मे रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत राज्यपाल आर.व्ही. अर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा मांडण्याची शक्यता आहे. तथापी, काँग्रेसने पाठिंबा देताना ‘कोणत्याही जातीयवादी शक्तीला आघाडीत थारा दिला जाणार नाही’ अशी महत्त्वाची अट घातली आहे. दुसरीकडे, IUML आणि AMMK या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
हेही वाचा – PM Modi & Shinde Viral Video : बंगालमध्ये शपथविधीनंतर मोदींची शिंदेंच्या पाठीवर थाप
जल्लोषाचे वातावरण
तथापी, VCK प्रमुख थोल. थिरुमावलावन यांनी समर्थनाचे अधिकृत पत्र जारी केल्याची पुष्टी TVK नेते आधव अर्जुन यांनी केली आहे. या निर्णयामुळे विजय यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह असून तामिळनाडूत प्रथमच एका आघाडी सरकारचे नेतृत्व ‘थलपती’ विजय करणार आहेत.