Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय थलपती यांचा राजकारणातला डेब्यू ‘सुपरहिट’; या 7 घोषणा ठरल्या गेमचेंजर

महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर विजय यांनी तामिळनाडूतील महिला आणि तरुणांसाठी केलेल्या 7 मोठ्या घोषणा या विजयासाठी 'गेमचेंजर' ठरल्या आहेत.

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय थलपती यांचा राजकारणातला डेब्यू ‘सुपरहिट’; या 7 घोषणा ठरल्या गेमचेंजर

Tamil Nadu Election Result 2026 : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाला थक्क केले आहे. प्रसिद्ध अभिनेता थलपती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कझगम' (TVK) या पक्षाने आपल्या पहिल्याच निवडणुकीत 100 हून अधिक जागांवर आघाडी घेत राजकीय सत्तापालटाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर विजय यांनी तामिळनाडूतील महिला आणि तरुणांसाठी केलेल्या 7 मोठ्या घोषणा या विजयासाठी 'गेमचेंजर' ठरल्या आहेत. द्रमुकच्या सत्तेला सुरुंग लावत विजय आता तामिळनाडूचे नवे 'किंग' होण्याच्या मार्गावर आहेत.

1. मोफत गॅस सिलिंडरची 'अन्नपूर्णा' भेट
वाढत्या महागाईच्या काळात सामान्य कुटुंबांना आधार देण्यासाठी विजय यांनी 'अन्नपूर्णा सुपर सिक्स' योजनेची घोषणा केली. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या घोषणेमुळे महिला मतदारांनी टीव्हीके पक्षाला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे.

2. मोफत वीज आणि मूलभूत सोयीसुविधा
सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी आणि अंगणवाडी सेविकांसाठी 18000 रुपये व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी 10000 रुपये वेतन देण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव विजय यांनी मांडला आहे.

3. 'अण्णन सीर थिट्टम' अंतर्गत सोन्याची भेट
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी विजय यांनी 'अण्णन सीर थिट्टम' ही विशेष योजना मांडली. या योजनेद्वारे बहिणी आणि मुलींच्या विवाहासाठी 8 ग्रॅम सोने आणि रेशमी साड्या भेट देण्याचे वचन त्यांनी दिले आहे. या भावूक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या घोषणेने तमिळ मतदारांच्या मनात घर केले आहे.

हेही वाचा – Vijay Thalapathy: तामिळनाडूत 'थलपती' वादळ! अभिनेता विजयच्या कुटुंबाचा जल्लोष, बंगल्याबाहेर चाहत्यांचा महापूर

4. गृहिणींना आर्थिक सन्मान आणि बेरोजगारी भत्ता
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आता तामिळनाडूतही दिसून येत आहे. थलपती विजय यांनी राज्यातील गृहिणींना दरमहा 2500 रुपये देण्याचे मोठे आश्वासन दिले आहे. यासोबतच तरुणांना दिलासा देण्यासाठी पदवीधरांना 4000 रुपये आणि डिप्लोमा धारकांना 2500 रुपये बेरोजगारी भत्ता जाहीर केला. तसेच पाच लाख तरुणांसाठी 18000 रुपयांची रोजगार सहाय्यता योजना आणि 5000 ते 8000 रुपयांचे विद्यावेतन देण्याचे वचन दिले.

5. विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शैक्षणिक मदत
शिक्षण क्षेत्रावर भर देताना विजय यांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 15000 रुपयांची शैक्षणिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. ही मदत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

6. पेन्शन योजनेचा मोठा विस्तार
ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांच्या सन्मानासाठी विजय यांनी पेन्शनची रक्कम वाढवून दरमहा 3000 रुपये करण्याचे वचन दिले. या योजनेचा लाभ 15 लाख नवीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे, ज्यामुळे समाजघटकातील उपेक्षित वर्गाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला आहे.

7. महिलांसाठी मोफत बस प्रवास
तामिळनाडूतील महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी, राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचे आश्वासन टीव्हीके पक्षाने दिले आहे.

हेही वाचा – Suvendu Adhikari : एकेकाळी ममतादीदींच्या अगदी जवळचे आणि अत्यंत विश्वासू… आता कट्टर विरोधक; कोण आहेत सुवेंदु अधिकारी?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number