Aaditya Thackeray: ‘भोंदू बाबासोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांवरही कारवाई करा…’; खरात प्रकरणात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांवर आणि त्यांच्या 'भोंदू भक्तांवर' कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.<br/>

Aaditya Thackeray: ‘भोंदू बाबासोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांवरही कारवाई करा…’; खरात प्रकरणात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aaditya Thackeray: अशोक खरात आणि त्याभोवती फिरणाऱ्या वादग्रस्त प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली असून, त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांवर आणि त्यांच्या ‘भोंदू भक्तांवर’ कडक कारवाई झाली पाहिजे,” अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

‘पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारा प्रकार’
आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना म्हटले की, “जे प्रकार सध्या समोर येत आहेत, ते अत्यंत भयानक आहेत. महाराष्ट्र नेहमीच एक पुरोगामी राज्य राहिले आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोण्यासारखे प्रकार घडत असतील, तर ते दुर्दैवी आहे. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर आणि कडक कारवाई होणे गरजेचे आहे.”

भोंदू भक्तांवरही ओढले ताशेरे
केवळ भोंदू बाबावर कारवाई करून भागणार नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्यांवरही निशाणा साधला. “नुसत्या भोंदू बाबावर नाही, तर त्यांच्या भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे. मंत्रिमंडळातील जे कोणी सदस्य या बाबाच्या संपर्कात होते किंवा ज्यांचे फोटो समोर आले आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे,” असे ठाकरे यांनी ठामपणे नमूद केले.

हेही वाचा – Ashok Kharat Case: ‘अशोक खरात ही महाराष्ट्रातली एपस्टीन फाईल…’; अरविंद सावंत यांचा महायुती सरकारवर निशाणा

मंत्रिमंडळातील फोटोंवरून सत्ताधाऱ्यांना घेरले
या प्रकरणात अनेक सत्ताधारी मंत्र्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे हे प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पावले उचलली पाहिजेत, असा सूर त्यांनी लावला आहे. या मागणीमुळे खरात प्रकरणाला आता अधिक राजकीय धार चढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number