Nana Patole: ‘भगवान श्रीरामाला लुटणारी व्यवस्था आता गुरुद्वारा लुटायला निघालीये…’; नाना पटोलेंचा सरकारवर खळबळजनक आरोप

धार्मिक तेढ निर्माण करून सत्तेचा मलिदा कसा आपल्या ताब्यात राहील, यासाठीच हे सरकार काम करत आहे, असा घणाघाती आरोप पटोले यांनी केला आहे.

Nana Patole: ‘भगवान श्रीरामाला लुटणारी व्यवस्था आता गुरुद्वारा लुटायला निघालीये…’; नाना पटोलेंचा सरकारवर खळबळजनक आरोप

Nana Patole:  महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे सरकारवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “धार्मिक तेढ निर्माण करून सत्तेचा मलिदा कसा आपल्या ताब्यात राहील, यासाठीच हे सरकार काम करत आहे,” असा घणाघाती आरोप पटोले यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीतून प्रत्येक धर्मामध्ये वाद निर्माण करून स्वतःच्या सत्तेच्या पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली. या संदर्भातील तीव्र भावना त्यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केल्या. 

हेही वाचा – ‘मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, जे बोललो ते कायद्याच्या चौकटीत’; विश्वास नांगरे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

नांदेड गुरुद्वारा कायद्यातील बदलाला तीव्र विरोध
नांदेड येथील शीख समुदायाचे पवित्र स्थान असलेल्या गुरुद्वाराचे महत्त्व अधोरेखित करताना नाना पटोले म्हणाले की, शीख धर्मात नांदेडच्या गुरुद्वाराला ‘पाचवा तख्त’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1956 च्या कायद्यानुसार या गुरुद्वाराची कमिटी कार्यरत आहे आणि आजवर जगभरातून आलेल्या भाविकांनी या पवित्र स्थानाचे पावित्र्य राखत त्याचा विकास केला आहे. मात्र, सध्याच्या सरकारने आता एक नवीन ‘जावईशोध’ लावला असून 1956 चा मूळ बोर्डच रद्द करण्याचा घाट घातला आहे. तिथली व्यवस्था मोडीत काढून आपल्या मर्जीतील दुसरी लोकं तिथे बसवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

श्रद्धेचा पैसा लुटण्याची सरकारची मानसिकता
सरकारच्या मानसिकतेवर प्रहार करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, गुरुद्वारामध्ये येणाऱ्या पैशांची उधळपट्टी करण्याची या सरकारची मानसिकता आहे. “ज्यांनी राम मंदिरातील लोकांच्या श्रद्धेचा पैसा लुटला, तीच भाजपची पिलावळ आता नांदेडच्या गुरुद्वारामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. भगवान श्रीरामाच्या नावाने सत्तेत येऊन त्यांनाच लुटणारी व्यवस्था आता गुरुद्वारा लुटायला निघाली आहे, म्हणूनच या निर्णयाला जागतिक पातळीवरून शीख समुदायाने केलेला विरोध पूर्णपणे योग्य आहे, असे समर्थनही पटोले यांनी यावेळी केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number