Nitesh Rane : मोठी बातमी! नितेश राणेंच्या ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग; घातपाताचा संशय? मुंबई पोलीस सतर्क

जुहू परिसरातील नितेश राणे यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अनोळखी बॅग बराच वेळ पडून होती. बराच वेळ होऊनही ही बॅग घेण्यासाठी कोणीही न आल्याने तिथल्या सुरक्षा रक्षकांचा संशय बळावला.

Nitesh Rane : मोठी बातमी! नितेश राणेंच्या ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग; घातपाताचा संशय? मुंबई पोलीस सतर्क

Nitesh Rane : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच भाजपचे आक्रमक नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील 'सुवर्णगड' या निवासस्थानाबाहेर एक बेवारस बॅग सापडल्याने रविवारी, 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, सुरक्षा यंत्रणा तातडीने कामाला लागल्या आहेत. केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर संपूर्ण मुंबईत या घटनेची वेगाने चर्चा सुरू झाली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुहू परिसरातील नितेश राणे यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अनोळखी बॅग बराच वेळ पडून होती. बराच वेळ होऊनही ही बॅग घेण्यासाठी कोणीही न आल्याने तिथल्या सुरक्षा रक्षकांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने याबद्दल स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवले. विशेष म्हणजे, CCTV फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती ट्रॉलीसारखी दिसणारी ही बॅग तिथे ठेवून पळ काढताना दिसत आहे. या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून घातपाताचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न तर नाही ना, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Mira Bhayandar Election: मिरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांनी गेम फिरवला; भाजपच्या 'या' तीन दिग्गज नगरसेवकांनी धरली शिंदे गट शिवसेनेची वाट

पोलीस यंत्रणा आणि तपास कार्य
घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा ताबा घेतला आणि परिसराची नाकेबंदी केली. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले आहे. हे पथक सध्या त्या बॅगेची बारकाईने तपासणी करत असून त्यात स्फोटके किंवा इतर काही घातक वस्तू आहेत का, याचा शोध घेत आहे. पोलिसांनी बंगल्याच्या आसपासचा बंदोबस्त वाढवला असून CCTV च्या माध्यमातून त्या अज्ञात व्यक्तीचा मागोवा घेतला जात आहे.

राजकीय पार्श्वभूमी आणि सुरक्षेची चिंता
नितेश राणे हे सातत्याने आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेसाठी चर्चेत असतात, ज्यामुळे त्यांना यापूर्वीही अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सध्या मुंबईत महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. अशा संवेदनशील काळात एका कॅबिनेट मंत्र्याच्या घराबाहेर अशा प्रकारे संशयास्पद वस्तू आढळणे हे सुरक्षा व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान मानले जात आहे. पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या घटनेमागील खरे सत्य समोर येणार आहे.

हेही वाचा – Tushar Apte Resignation: भाजपचा बदलापुरात यू-टर्न; बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेचा अखेर राजीनामा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number