Suspicious Death : पलंगावर झोपून मोबाईलवर रील्स पाहतानाच चौथीतल्या मुलावर काळाची झडप; नेमकं काय घडलं?

चौथीतला मुलगा मोबाईलवर रील्स पाहता पाहता अचानक जग सोडून गेला या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोक याबद्दल तर्क-वितर्क करत आहेत.

Suspicious Death : पलंगावर झोपून मोबाईलवर रील्स पाहतानाच चौथीतल्या मुलावर काळाची झडप; नेमकं काय घडलं?

Suspicious Death of a Boy in Amroha : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास, चौथी इयत्तेत शिकणारा मयंक नावाचा मुलगा आपल्या घरात चारपाईवर झोपून मोबाईलवर रील्स पाहण्यात दंग होता. त्याचे कुटुंब आपल्या कामात होते. अचानक मयंक निपचित जमिनीवर पडला. अवघ्या 10 वर्षांच्या मयंकला अशा अवस्थेत पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

त्याला भोवळ आली असावी असा कुटुंबियांचा सुरुवातीला समज झाला. पण मयंकची हालचाल थांबल्यानं घरच्यांच्या मनात शंका निर्माण झाली. बेशुद्ध पडलेल्या मुलाला आई हाका मारत होती. पण मयंकनं प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी त्याला उचलून डॉक्टरांकडे नेलं.

उपचार मिळण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मयंक बेशुद्ध पडताच घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या एका खासगी डॉक्टरांकडे नेले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला धनौरा येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉ. अवनीश गिल यांनी मयंकची नाडी आणि रक्तदाब तपासला, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती मुलाला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, मयंकचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हेही वाचा – Jiosphere Benefits: YouTube चं 'प्रीमियम' गुपित आलं बाहेर; फक्त हा ब्राउझर बदला आणि मिळवा जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहण्याचा आनंद

निसर्गाच्या नियमापलीकडची घटना?
एका अल्पवयीन मुलाला इतक्या कमी वयात हार्ट अटॅक का यावा, या प्रश्नाने वैद्यकीय क्षेत्रालाही कोड्यात टाकले आहे. मयंक हा शेतकरी दीपक कुमार यांचा मोठा मुलगा होता. दीपक आणि त्यांची पत्नी पुष्पा देवी आपल्या दोन मुलांसोबत आनंदाने राहत होते, पण या घटनेने त्यांच्या सुखी संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान मुलांमधील हृदयविकाराचे वाढते प्रमाण आता पालकांसाठी चिंतेचा मोठा विषय ठरत आहे.

गावात शोककळा आणि तर्कवितर्क
घटनेनंतर मयंकच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन न करताच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यामुळे मृत्यूचे अधिकृत तांत्रिक कारण समोर आले नसले तरी, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापराचा याच्याशी काही संबंध आहे का, अशा चर्चा गावात सुरू आहेत. एका क्षणापर्यंत हसता-खेळता असणारा मयंक मोबाईल हातात असतानाच कायमचा सोडून गेल्याने संपूर्ण जुझेला चक गावात सध्या भीती आणि शांततेचे सावट पसरले आहे.

हेही वाचा – Aadhar Card New Feature: डिजिटल इंडियाचं पुढचं पाऊल; पूर्ण नंबर न देताही शेअर करता येणार माहिती; UIDAI चा मोठा निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number