Ajit Pawar Plane Crash: ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाडीचा संशय; रोहित पवारांचा थेट ‘या’ व्यक्तीवर खळबळजनक आरोप

आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर दावा केला असून, विमानातील तांत्रिक माहिती साठवणाऱ्या 'ब्लॅक बॉक्स' (FDR) सोबत छेडछाड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Ajit Pawar Plane Crash: ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाडीचा संशय; रोहित पवारांचा थेट ‘या’ व्यक्तीवर खळबळजनक आरोप

Ajit Pawar Plane Crash:  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र हादरला होता. बारामती विमानतळावर झालेल्या त्या भीषण विमान अपघाताच्या चौकशीला आता नाट्यमय वळण लागले आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर दावा केला असून, विमानातील तांत्रिक माहिती साठवणाऱ्या ‘ब्लॅक बॉक्स’ (FDR) सोबत छेडछाड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काय आहे रोहित पवारांचा नेमका आरोप?
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, व्ही. के. सिंग हे काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (FDR) मधील तांत्रिक माहिती ‘एडिट’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार यांनी यापूर्वीच हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. सध्या सीआयडी (CID) कडून सुरू असलेल्या तपासावरही त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे.

संसदीय समिती आणि फॉरेन्सिक ऑडिटचा इशारा
रोहित पवारांनी केवळ आरोपच केले नाहीत, तर संबंधित यंत्रणांना कडक इशाराही दिला आहे. “DGCA किंवा AAIB मधील जे अधिकारी या छेडछाडीत मदत करत आहेत, त्यांनी सावध राहावे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा सर्व फेरफार उघड होईल,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी संसदेच्या माध्यमातून विशेष समिती स्थापन करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या पतीला पोलिसाकडून मारहाण

घटनेची पार्श्वभूमी आणि वाढता संशय
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत असताना व्हीएसआर कंपनीच्या खासगी विमानाला भीषण अपघात झाला होता. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे प्राथमिक अंदाजात म्हटले गेले होते. मात्र, रोहित पवारांच्या नव्या दाव्यांमुळे आणि माहिती दडपली जात असल्याच्या आरोपांमुळे यामागे एखादे मोठे राजकीय कारस्थान तर नाही ना? अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number