Rajya Sabha Election 2026: महायुतीचा सस्पेन्स वाढला! छगन भुजबळांच्या आग्रही मागणीवर आज रात्री होणार मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत छगन भुजबळ हे दिल्लीला जाण्यास उत्सुक असल्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकृतपणे सांगण्यात आले.

Rajya Sabha Election 2026: महायुतीचा सस्पेन्स वाढला! छगन भुजबळांच्या आग्रही मागणीवर आज रात्री होणार मोठा निर्णय

Rajya Sabha Election 2026: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये कमालीची राजकीय उत्कंठा निर्माण झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रबळ दावा ठोकला असून, या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. राज्यसभा उमेदवारीचे हे गतिमान राजकारण आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा या निर्णयाकडे लागल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत छगन भुजबळ हे दिल्लीला जाण्यास उत्सुक असल्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकृतपणे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर, छगन भुजबळ यांनी राज्यसभा खासदार म्हणून केंद्रात गेल्यास, राज्यातील त्यांच्या रिक्त होणाऱ्या मंत्रिपदावर त्यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची वर्णी लावली जावी, अशी आग्रही मागणीही पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीच्या या प्रस्तावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी यावर चर्चा करून आज रात्री उशिरापर्यंत अंतिम निर्णय कळवू," असे आश्वासन राष्ट्रवादीला दिले आहे.

भुजबळ कुटुंबाची नाराजी आणि 'न्याया'ची मागणी
यापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत छगन भुजबळ यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या संघर्षाची आणि भुजबळ कुटुंबाच्या योगदानाची आठवण करून दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षात इतर प्रमुख कुटुंबांना लावण्यात आलेला न्याय भुजबळ कुटुंबाला का नाकारला जातोय? असा स्पष्ट सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांचे कुटुंब आणि सुनील तटकरे यांचे कुटुंब या दोन्ही कुटुंबांतील प्रत्येकी एक सदस्य सध्या दिल्लीत आणि एक सदस्य राज्याच्या मंत्रिमंडळात कार्यरत आहे. मग हाच समान नियम भुजबळ कुटुंबाला का लागू केला जात नाही, अशी उघड नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा – Cockroach Party Delhi Protest : पेपर फुटीविरोधात जंतर-मंतरवर तरुणांचा एल्गार; ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह या 5 मोठ्या मागण्या

दिल्लीत संधी मिळण्याची दाट शक्यता; दोन दिवसांचा अवधी शिल्लक
सध्याच्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेतला तर छगन भुजबळ यांना दिल्लीत पाठवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय गणिते जुळून आल्यास समीर भुजबळ यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळण्याचे संकेतही मिळत आहेत. दरम्यान, राज्यसभेच्या या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. 8 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्यामुळे, महायुतीचे नेते या वेळेत काय तोडगा काढतात आणि मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातून काय निर्णय येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number